मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; ‘या’ दिवशी पाणीपुरवठा राहणार बंद

Mumbai Water Cut | मुंबईत तापमान प्रचंड वाढलं आहे. त्यामुळे येथे उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आलाय. उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अशात पाण्याचीही वणवण होणार आहे. मुंबईत दोन दिवस पाणी कपात केली जाणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून काही भागांचा पाणीपुरवठा बंद केला जाणार आहे.

27 मे आणि 28 मे रोजी पश्चिम उपनगरातील काही भागात दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. . येथील जीर्ण झालेल्या जलवाहिनी बदलण्याचे काम पालिकेने हाती घेतले असल्याने येथील पाणीपुरवठा बंद (Mumbai Water Cut) असणार आहे.

त्यामुळे या भागातील नागरिकांनी एक दिवस पाणी पुरेल असा साठा करून ठेवावा असं आवाहन करण्यात आलंय. मिळालेल्या माहितीनुसार मालाड पश्चिम भागातील पाणी पुरवठ्यात कायमस्वरूपी सुधारणा करण्याच्या हेतूने पी उत्तर विभागातील मार्वे मार्गावरील 900 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी ही बदलण्यात येणार आहे.

‘या’ भागात पाणीपुवठा बंद राहणार

ही जलवाहिनी जीर्ण झाली असून वारंवार फुटत असल्याने हे काम हाती घेण्यात आलंय. म्हणूनच 27 आणि 28 मे पासून पी उत्तर, आर दक्षिण व आर मध्य या भागात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद (Mumbai Water Cut) राहील.

पी उत्तर विभागमधील अंबोजवाडी येथे 27 तारखेला पाणी पुरवठा बंद राहील.तर, 28 तारखेला आजमी नगर, जनकल्याण नगर , मालवणी , छत्रपती शिवाजी महाराज संकूल, न्यू म्हाडा ले आऊट, गोराई गाव, बोरिवली येथे पाणीपुरवठा बंद राहील.

30 मेपासून पाणीकपात केली जाणार

दरम्यान, मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाणीसाठ्यात घट झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून गुरुवार दिनांक 30 मे 2024 पासून 5 टक्के पाणीकपात तर बुधवार दिनांक 5 जून 2024 पासून 10 टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतलाय. सध्या काही भागामध्ये 27 आणि 28 मेला पाणी पुरवठा बंद राहणार आहे. 10 टक्के पाणी कपातची अंमलबजावणी ही पुढील महिन्यापासून केली जाईल.

News Title- Mumbai Water Cut

महत्त्वाच्या बातम्या –

आज या राशीच्या व्यक्तींनी प्रवास टाळावा

डोंबिवली एमआयडीसी स्फोट प्रकरणी कंपनीच्या मालकावर मोठी कारवाई!

भर स्टेडियममध्ये जान्हवी कपूरसोबत घडला धक्कादायक प्रकार, व्हिडीओ तूफान व्हायरल

पोलीस कॉन्टेबलची पबमध्ये पार्टी; रविंद्र धंगेकरांकडून पोलिसांवर फोटोबॅाम्ब

पुणे अपघात प्रकरणातील सीसीटीव्हीबाबत धक्कादायक खुलासा समोर!