23 वर्षीय तरूणीने संपवलं आपलं जीवन, मरीन ड्राईव्हवरून समुद्रात घेतली उडी

Mumbai | सध्या देशात आणि राज्यात आत्महत्येचं सत्र सुरू आहे. अनेक तरूण-तरूणी ताण तणावात येऊन आत्महत्या करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे उच्चशिक्षित व्यक्तीही स्वत:चं जीवन संपवताना दिसत आहेत. आता मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. ममता कदम असं आत्महत्या केलेल्या मुलीचं नाव असून ती मुलगी अंधेरी येथे रहिवाशी आहेत. पोलिसांनी मुलीची बॅग आणि मोबाईलची तपासणी केल्यानंतर वैयक्तिक कारणास्तव आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. (Mumbai)

आत्महत्या करून तरूणीने जीवन संपवलं

मरीन ड्राईव्ह येथे सोमवारी एक तरूणी बुडत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे मरीन ड्राईव्ह पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. या पथकाने मुलीला समुद्रातून बाहेर काढून जी.टी.रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं आहे. यामुळे ही आत्महत्या असल्याची शक्यता पोलिसांना आहे. (Mumbai)

महिलेने समुद्रात उडी मारण्यापासून चौपाटीवर तिची बॅग सोडली होती. त्यातील ओळख पत्रावरून महिलेचे नाव हे ममता प्रवीण कदम असल्याची माहिती समोर आली आहे. सकाळी ती कामावर जाते असं सांगून गेली. एका हॉटेल बाहेर जात तिने मरीन ड्राईव्हचा परिसर गाठत ती समुद्रात उतरली. इथेच बुडून तिचा मृत्यू झाला आहे.

सूत्रांकडून मोठी माहिती

या घटनेची माहिती मिळताच सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास सुरूवातीला युवतीला पाण्यातून बाहेर काढण्यात आलं. तरूणीचा मोबाईल पोलिसांना सापडला होता. त्यातील व्हॅट्सअॅपरील चॅटिंग पोलिसांनी वाचली. त्यामुळे त्या मुलीने आत्महत्या केली असल्याचं सूत्रांनी सांगितलं. (Mumbai)या घटनेबाबत पोलीस तपास करत आहेत.

News Title – Mumbai Young Girls Jump Into Sea Marine Drive Suicide Marathi News

महत्त्वाच्या बातम्या

देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेचा ग्राहकांना झटका!

“जिथे जातात तिथेच ते XXX खातात”; जरांगेंची पुन्हा एकदा भुजबळांवर सडकून टीका

“पदव्या घेऊन काय होणार नाही, पंक्चरचे दुकान टाका”; भाजप आमदाराचा विद्यार्थ्यांना अजब सल्ला

“आम्ही मंत्री, मुख्यमंत्री झालो म्हणजे तुमच्यापेक्षा..”; छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य

तब्बल 46 वर्षांनी जगन्नाथ मंदिराच्या खजिन्याचं कुलूप उघडलं; धन बघून थक्क व्हाल