बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबईचा जगभरात डंका! प्रामाणिकपणाच्या सर्वेक्षणात पटकावला दुसरा क्रमांक

मुंबई | जगातील मोठ्या शहरांतील लोकांचा प्रामाणिकपणा तपासण्यासाठी सर्वे करण्यात आला. रीडर्स डायजेस्टनंने हा अनोखा प्रयोग केला आहे. या प्रयोगामध्ये काही वाॅलेट जाणीवपुर्वक हरवल्याचं भासवण्यात आलं. हा प्रयोग करतांना 192 वाॅलेट सोडण्यात आली होती. त्या वाॅलेटमध्ये एखाद्या व्यक्तीचा नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, फोटो आणि बिझनेस कार्ड ठेवण्यात आलं होतं. हे सर्व असूनही वाॅलेट परत करतात की नाही, यांचे प्रयोग करण्यात आले.

हा प्रयोग करतांना मुंबई शहरात 12 वाॅलेट ठेवली गेली. यांपैकी 8 वाॅलेट परत करण्यात आली आहेत. मुंबईत ठेवण्यात आलेल्या पाकीटामध्ये 36,000 हजार ठेवण्यात आले होते. त्यामुळे या प्रयोगात मुंबईचा दुसरा क्रमांक लागला आहे. तसेच मुंबईसह जगातील 16 शहरांमध्ये हा प्रयोग करण्यात आला. हेलसिंकी या शहराने जगात प्रथम क्रमांक मिळवला आहे. हे शहर फिनलँड या देशात आहे.

हेलसिंकी शहरामध्ये 12 वाॅलेटपैकी 11 वाॅलेट परत मिळाली आहेत. तर या प्रयोगात सर्वात खालच्या स्थानी पोर्तुगालमधील लिस्बन शहर आहे. यामध्ये 12 वाॅलेटमध्ये फक्त एकच वाॅलेट परत करण्यात आलं आहे.

दरम्यान, आनंद महिंद्रांनी ही माहिती ट्विटरच्या माध्यमातून शेअर केली आहे. यामध्ये वॉलेट एक्सपिरीमेंट तपासण्याचा प्रयत्न केला. यामध्ये शहरात किती लोक प्रामाणिक आहेत हे त्यांना पहायचं होतं. त्यामध्ये आता मुंबईकर अव्वल ठरले आहेत.

थोडक्यात बातम्या-

सलमान खानला उच्च न्यायालयाची नोटीस; ‘या’ प्रकरणामुळे रहावं लागणार हजर

‘या’ कंपनीला आले सोन्याचे दिवस, एका दिवसात विकल्या इतक्या कोटींच्या स्कूटर!

देशाला दिशा दाखवणारं क्षेत्र म्हणजे महाराष्ट्राचं सहकार क्षेत्र- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

प्रविण दरेकरांना राष्ट्रवादीच्या महिला आघाडीकडून ‘प्रविणा मावशी’ नावाची उपमा

यंदा पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड, मुरलीधर मोहोळ यांनी केली मोठी घोषणा!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More