बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! म्हणूनच मुंबईकरांना वाटते पावसाची भीती?; व्हिडीओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का

मुंबई | राज्यात मान्सून लवकर दाखल झाल्यामुळे पहिल्या पावसाचा मोठा फटका बसला आहे. राज्याची राजधानी असलेल्या मुंबईची तुंबई झाली. मुंबईतील दादर, सायन, माटुंगा, लोअर परेल, मरिन ड्राईव्ह यासह अनेक भागात पाणी साचलेलं. त्यामुळे मुंबईतील रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम झाल्याचं दिसुन आलं होतं. मात्र अशातच मुंबईतील एक चारचाकी गाडी बुडतानाचा व्हिडीओ व्हायरल झालेला दिसत आहे.

मुंबईमध्ये पाऊस आली मुुंबईकरांनी का धास्ती बसते?, हे या व्हिडीओवरून दिसत आहे.  व्हिडीओमध्ये दिसत आहे की, घरासमोर पार्क केलेली चारचाकी गाडी अचानक एका खड्ड्यात बुडत दिसत आहे. मात्र ही कार काही क्षणात पुर्णपणे खड्ड्यात बुडून गेली आहे. ही घटना घाटकोपरची असल्याची माहिती समजत आहे.

कार जशजशी खड्ड्यात जात आहे तसतशी ती पुर्णपणे आतमध्ये गेलेली दिसत आहे. यावरून आपल्याला लक्षात येईल की, खड्डा किती धोकादायक आणि खोल आहे. कार गायब झाल्याने अनेकजणांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

दरम्यान, मुंबईतल्या पश्चिम उपनगर अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, गोरेगाव दमदार पाऊस सुरू आहे. तर पूर्व उपनगरांमध्ये मुलुंड, भांडूप, घाटकोपर, चेंबूर या परिसरातही पावसाची रिमझिम सुरु आहे. मध्य रेल्वेची मुंबईच्या दिशेनं जाणारी वाहतूक पुढील सूचना मिळेपर्यंत बंद करण्यात आली आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

ब्युटी क्वीनने प्रेमाचं नाटक करत बनवला पॉर्न व्हिडीओ त्यानंतर केलं हे घृणास्पद कृत्य

शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीवरून रामदास आठवले यांची भन्नाट कविता

“नाना पटोलेंना मुख्यमंत्री, तर राहुल गांधींना पंतप्रधान व्हावसं वाटतंय, पण…”

बाबो! ‘या’ माॅडेलने फक्त बेडशीट गुंडाळून केला फोटोशूट, पाहा तिचे बोल्ड फोटो

‘या’ जिल्ह्याची तिसऱ्या टप्प्यातून थेट पहिल्या टप्प्यात गरुडभरारी; उद्या सर्वकाही उघडणार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More