बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबईकरांची पाससाठी रेल्वे स्थानकावर गर्दी, वाचा पाससाठी कोणती कागदपत्रं गरजेची?

मुंबई | लसीचे देन्ही डोस घेतलेल्या नागरिकांसाठी 15 तारखेपासून लोकल सुरु करण्यात येत असल्याचा निर्णय ठाकरे सरकारने जाहीर केला आहे. लोकलने प्रवास करण्यासाठी मुंबईकरांना आवश्यक नोंदणी करुन क्यू आर कोड पास बनवावा लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर आजपासून मुंबईतील बहुतांश ठिकाणी नोंदणी सुरु झाली आहे. यामुळे आज सकाळपासूनच पाससाठी मुंबईकरांची झुुंबड उडालेली पाहायला मिळत आहे.

लसीचे दोन्ही डोस घेऊन 14 दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना पास देण्यात येत आहेत. यासाठी मुंबईत ठिकठिकाणी व्हेरिफिकेशन स्टॉल्स लावण्यात आले आहेत. तसेच वसई विरार महापालिकेने नागरिकांच्या मदतीसाठी रेल्वे स्थानकावर मदत केंद्र देखील स्थापन केलं आहे.

लोकलचा पास मिळवण्यासाठी काही कागदपत्रं आवश्यक आहेत. फोटो असलेले मूळ ओळखपत्र किंवा छायांकीत प्रत आणि लसीचे दोन्ही डोस घेतलेलं प्रमाणपत्र पास काढण्यासाठी आवश्यक आहे. या कागदपत्रांसह मदत केंद्रावर जाऊन कागदपत्रं तपासून त्यावर शिक्का मारून घेणं गरजेचं आहे. यानंतर तिकीट केंद्रावर नागरिकांना पास मिळणार आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर नागरिकांनी लसीकरण केंद्रावर देखील मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. बीकेसी लसीकरण केंद्रावर आज पहाटेपासूनच नागरिकांनी रांगा लावल्या आहेत.

थोडक्यात बातम्या –

राज्य सरकारचा मोठा निर्णय; राजीव गांधी यांच्या नावाने दिला जाणार पुरस्कार

शाळा उघडताच कोरोनाचा शिरकाव; 20 विद्यार्थीं कोरोना पाॅझिटिव्ह सापडल्यानं खळबळ

“लसीचे दोन्ही डोस घेतलेले मुख्यमंत्री मंत्रालयात जाणार की अजूनही घरुनच काम करणार?”

“भाजपला मराठा आरक्षणाचं श्रेय हवं असेल तर…”

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More