बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबईकरांनी करुन दाखवलं! आज अवघ्या ‘इतक्या’ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

मुंबई | गेल्या काही महिन्यांमध्ये मुंबईमध्ये कोरोना महामारीचा उद्रेक पाहायला मिळाला होता. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित आढळत होते. मात्र, अलिकडे काही आठवड्यांमध्ये कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचं दिसून येत आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये 24 तासात एकूण 404 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच आज एकूण 382 रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना आजची आकडेवारी ही दिलासादायक असल्याचं पाहायला मिळत आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये सध्या 5 हजार 280 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण असून, कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा दर हा 97 टक्क्यांवर असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे. आजपर्यंत बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील एकूण 7 लाख 11 हजार 697 रुग्ण कोरोनामधून बरे झाले आहेत. सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने मुंबईची कोरोनामुक्तीकडे आगेकूच होत असल्याचं सकारात्मक चित्र पाहायला मिळत आहे.

रुग्णवाढीचा दर हळूहळू कमी होईल, असा विश्वास मुंबई महापालिकेकडून व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रासह मुंबईतील रुग्णसंख्या ही झपाट्याने वाढत होती. पण मुंबईतील रुग्णसंख्या ही मागच्या काही दिवसात हळुहळु कमी होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या-

सोन्याच्या दरात आज पुन्हा वाढ, वाचा ताजे दर

…अन् आराध्या बच्चनने अभिषेकऐवजी रणबीरला कपूरला बाबा म्हणून मारली मिठी

“मला न्याय मिळाला नाही तर मी धनंजय मुंडेंच्या दारासमोर आत्मदहन करेल”पुणे कोरोना अपडेट! जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

कौतुकास्पद! मराठमोळ्या अभिनेत्रीची पुरग्रस्तांना तब्बल 10 कोटींची मदत

पुणे हादरलं! दत्ता फुगेंच्या मुलाच्या कानशिलात लगावल्याचा राग, तरुणाची हत्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More