मुंबईकरांनो काळजी घ्या; हवामान खात्याचा महत्त्वाचा इशारा

Mumbaikars Get Ready for Heat Wave Temperature Rises

Heat Wave | मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच मुंबईमध्ये (Mumbai) तापमानाने उच्चांक गाठला असून, नागरिकांना उष्णतेच्या लाटेला (Heat wave) तोंड द्यावे लागत आहे. तापमान 38 अंशांवर पोहोचल्याने, पुढील दोन महिने मुंबईकरांसाठी अधिक त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे.

फेब्रुवारी ठरला उष्ण

मागील फेब्रुवारी महिन्यात उष्णतेच्या लाटांनी नागरिकांना त्रस्त केले होते. हवामान खात्याच्या (Weather Department) अंदाजानुसार, मार्च आणि मे महिन्यात उष्णतेच्या लाटांची तीव्रता अधिक राहणार आहे.

फेब्रुवारीमध्ये देशातील कमाल तापमान सरासरी 27.58 अंश सेल्सिअस असते, पण यंदा ते 29.7 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, तर किमान तापमान 13.82 अंश सेल्सिअसऐवजी 15.2 अंश सेल्सिअस होते. 1901 पासूनच्या नोंदीनुसार, 2023 मधील 29.44 अंश सेल्सिअस तापमानानंतर, यंदाचा फेब्रुवारी हा दुसरा सर्वात उष्ण महिना ठरला.

तापमानात घट, तरीही काळजी घ्यावी

गेल्या तीन दिवसांपासून मुंबईकर उष्ण हवामानामुळे त्रस्त झाले आहेत, कारण तापमान 38 अंशांवर पोहोचले होते. शुक्रवारी तापमानात थोडी घट झाली आणि सांताक्रुझ (Santacruz) येथे 35.3 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले. ही घट काही दिवस टिकून राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. नागरिकांनी मार्च आणि मे महिन्यात उष्णतेपासून सुरक्षित राहण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. (Heat Wave)

मुंबईप्रमाणेच पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अकोला (Akola) आणि नागपूरमध्येही (Nagpur) तापमान वाढू लागले आहे. पुण्यात तापमान 35 अंश सेल्सिअसच्या आसपास आहे, तर विदर्भ (Vidarbha) आणि मराठवाड्यातही (Marathwada) तापमान वाढ जाणवत आहे.

Title : Mumbaikars Get Ready for Heat Wave Temperature Rises

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .