बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

निवडणुकीत मुंबईकर शिवसेनेला जागा दाखवून देतील- चंद्रकांत पाटील

मुंबई | आगामी काही महिन्यात आता मुंबई महापालिकेच्या निवडणूकांचं बिगूल वाजणार आहे. काही महिन्यातच मुंबई महापालिकेच्या निवडणूका जाहीर होणार आहे. मागील मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना विरूद्ध भाजप अशी रंगतदार चुरस निर्माण झाली होती. अखेर शिवसेनेने मुंबई महापालिकेवर भगवा फडकवला होता. मुंबईत भाजपची चांगली पकड तयार झाल्याने आता भाजप शिवसेनेला मोठी टक्कर देण्याच्या तयारीत आहे. दोन्ही पक्ष आता निवडणूकीच्या तयारीत लागलेले दिसत आहेत.

मुंबईत पावसाच्या पाण्यामुळे होणाऱ्या अडचणीमुळे आता भाजपने शिवसेनेवर टीका केली आहे. ‘हजारो कोटींचा खर्च करूनही मुंबईतील नालेसफाईचा प्रश्न सुटत नाही. मी सुद्धा काल मुंबईत अडकलो होतो. मुंबई तुंबई होतेय हे खरं आहे, असं सांगतानाच येत्या पालिका निवडणुकीत मुंबईकर शिवसेनेला जागा दाखवून देतील’, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

माझ्या वाढदिवसानिमित्ताने मी नेहमी काही तरी वेगळं करत असतो. रिक्षाचालकांना कुपन, रेशन किट वाटप केले. तीन हजार लोकांना हे वाटप केलं. वंचित घटकांसाठी मोफत लसीकरण सुरू केलं आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्यात भाग घेतला आहे, असं देखील चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चांगलं जमतंय पण आमच्याशी का जमत नाही माहित नाही, पण आमच्या वरिष्ठ नेत्यांनी जर आदेश दिले तर वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार आहोत, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. तर वाघाशी मैत्री होत नाही, वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची, अशा शब्दात संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना उत्तर दिलंय.

थोडक्यात बातम्या-

लहान मुलांना कोरोना झालाय?; केंद्र सरकारच्या ‘या’ मार्गदर्शक सूचना नक्की वाचा…!

अखेर आयपीएलचा मुहूर्त ठरला; आयपीएलच्या तारखांबाबत बीसीसीआयची अधिकृत घोषणा

“मुख्यमंत्री बसले घरी, मुंबईची जनता विचारी ही कोणाची जबाबदारी?”

‘50% लहान मुलांच्या शरिरात कोरोना अँटीबाॅडी’; लसीच्या चाचणीपुर्वी धक्कादायक खुलासा

“तरुणाने भररस्त्यात फ्रान्सच्या अध्यक्षांच्या श्रीमुखात मारली, जनतेच्या संयमाचा कडेलोट होऊ देऊ नका”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More