मुंबईचा सलग चौथा पराभव; रोहितचा ‘हा’ हुकमी एक्का ठरतोय फेल
मुंबई | आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिकवेळा विजेतेपद पटकावणारा संघ म्हणून मुंबई इंडियन्सला ओळखण्यात येतं. मुंबईला आयपीएल 2022 च्या सुरूवातीच्या चारही सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे. परिणामी त्यांच्यावर सर्वस्तरातून टीका होत आहे.
मुंबईच्या विजयाचा प्रमुख स्तभ असणारा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराहला आपल्या लौकिकाला साजेस खेळ दाखवता येत नाहीयं. परिणामी संघातील इतर गोलंदाजांवर ताण येत आहे. चार सामन्यात बुमराहला केवळ एक बळी मिळवता आहे. मुंबईच्या पराभवाचं प्रमुख कारण त्यांची गोलंदाजी आहे.
राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू विरूद्धच्या सामन्यात मुंबईनं फक्त दोन विदेशी खेळाडू खेळवण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंतच्या आयपीएल इतिहासात मुंबईनं दोन परदेशी खेळाडू कधीच खेळवले नव्हते. परिणामी गोलंदाज आणि चुकिची रणनिती मुंबईच्या पराभवाचं कारण ठरत असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, सलग चार पराभव झाले असले तरी 2015 च्या हंगामात अशीच परिस्थिती असताना देखील मुंबईनं विजेतेपदावर नाव कोरलं होतं. आताही मुंबईचे चाहते अशाच कामगिरीची अपेक्षा करत आहेत.
थोडक्यात बातम्या –
कोल्हापूरचा गडी सगळ्यावर भारी! पृथ्वीराज पाटील ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी
“सुरक्षेत चुक करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करणार”
“शरद पवार, सुप्रिया सुळेंनी जमिनी बळकावल्या म्हणून…”
मोठी बातमी! एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्तेंना पोलीस कोठडी
“शरद पवारांच्या घरावरील हल्ल्यामागं संजय राऊतांचा हात”
Comments are closed.