मुंबई । देशात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. वृद्ध व्यक्तींना या टप्यात लस दिली जात आहे. तसेच अनेक वृद्धांनी ही लस टोचवून घेतली आहे.
मुंबईतील एका आजीबाईंनी सुद्धा ही कोरोना लस टोचवून घेतली आहे. विशेष म्हणजे लस घेतली त्या दिवशीच आजीबाईंनी आपल्या वयाची शंभरी पूर्ण केली आहे. या 100 वर्षांच्या आजीबाईंचं नाव प्रभावती खेडकर असं आहे. मुंबईच्या अंधेरी भागात त्या राहतात. त्या लशीकरणासाठी आल्या असता
मुंबईतील या आजीबाईंनी आधी कोरोना लसीकरण केलं आणि त्यानंतर लसीकरण केंद्रावरच कर्मचाऱ्यांसोबत त्यांनी आपला 100 वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवस साजरा केला तेव्हाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
काल 7 मार्चला महाराष्ट्रात 11,141 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 6013 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या वाढून 97,983 झाली आहे. महाराष्ट्रात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 22,19,727 पर्यंत गेली आहेत. राज्यात आतापर्यंत 52, 478 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, मुंबईत काल एका दिवसात 1361 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईतीली कोरोनाबाधितांची संख्या वाढून आता 3,35,569 वर पोहोचली आहे. तर मृतांची संख्या 11504 झाली आहे.
#WATCH | A 100-year-old woman received COVID-19 vaccine and celebrated her birthday with healthcare workers at BKC Jumbo vaccination centre in Mumbai yesterday. pic.twitter.com/ngwQEA7UWG
— ANI (@ANI) March 6, 2021
थोडक्यात बातम्या-
राज ठाकरेंनी घेतलेल्या ‘त्या’ भूमिकेचं देवेंद्र फडणवीसांकडून स्वागत, म्हणाले…
विधानभवनावर कोरोनाचं सावट; तब्बल एवढे कर्मचारी कोरोना पाॅझिटिव्ह
‘…म्हणून महाराष्ट्रात कोरोना वाढतोय’; केंद्रीय पथकाने सांगितलं कारण
नाणार प्रकल्पासाठी शरद पवारांचा राज ठाकरेंना फोन, म्हणतात…
‘तेरे को का लगता था की नहीं लौटेंगे…’; जयंत पाटलांसाठी समर्थकांनी शेअर केला व्हिडिओ
Comments are closed.