‘तारक मेहता..’ मधील बबिताचं शारीरिक शोषण, MeToo कॅम्पेनमधून खुलासा

मुंबई | ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील बबिताची भूमिका करणाऱ्या मुनमुन दत्ताही शारीरिक शोषणाला बळी पडलीय. सोशल मीडियावरील #MeeToo या कॅम्पेनद्वारे तिनं एक पोस्ट शेअर केलीय.

माझ्या शेजारचे काका कोणी नसताना मला बळजबरीनं मिठी मारायचे, माझ्यापेक्षा वयानं मोठा असणारा माझा चुलत भाऊ वाईट नजरेनं बघायचा, माझ्या जन्माच्यावेळच्या डॉक्टरांनीच मी 13 वर्षांची झाल्यावर गलिच्छ स्पर्श केला होता, माझे एक शिक्षक मुलींच्या ब्रा ओढून ओरडायचे आणि छातीवर मारायचे, असा धक्कादायक खुलासा तिनं केला.