अनिल देशमुखांना न्यायालयाचा दणका, देशमुखांच्या जामीनाला आणखी एकदा नकार
मुंबई | मनी लाँड्रिंग (Money Laundering) प्रकरणी अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) फेटाळला आहे. त्यांना अटक होऊन सहा महिने उलटून गेले आहेत. अटकेच्या सहा महिन्यानंतरही जामीन मिळत नसल्याने देशमुखांसाठी ही चिंतेची बाब आहे. देशमुखांसोबतच या प्रकरणी त्यांचे आणखी दोन साथीदार अटकेत आहेत. त्यांचाही जामीन न्यायालयाने फेटाळला.
अनिल देशमुख आणि त्यांच्या इतर दोन साथीदारांनी आपल्या विरुद्ध दाखल केलेले आरोपपत्र अपूर्ण असल्याचा दावा करत मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज (Bail) दाखल केला होता. अनिल देशमुख यांच्यासोबत त्यांचे साथीदार कुंदन शिंदे (Kundan Shinde) आणि संजीव पालांडे (Sanjeev Palande) यांनी जामीन अर्जात सीबीआयने अपूर्ण कागदपत्र सादर केल्याचा दावा केला आहे. तर सीबीआयने संपूर्ण कागदपत्रे सादर न केल्याने जामीन मंजूर करण्याची मागणी न्यायालयाकडे केली.
सीबीआयने (CBI) तिघांचे आरोप फेटाळत आम्ही दाखल केलेेले आरोपत्र पुर्ण असल्याचे सांगितले. तसेच अजून काही कागदपत्रांच्या पूर्तेतेसाठी त्यांना अजून वेळ वाढवून मिळण्याची मागणी केली. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने मोठा झटका देत या तिघांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
दरम्यान, देशमुखांवर सीबीआय (CBI) आणि ईडीचे (ED) भ्रष्टाचाराचे आरोपत्र दाखल आहे. तसेच त्यांच्यासोबत आणखी चार जणांवर जे त्यांचे साथीदार आहेत, ईडीचे आरोप दाखल आहेत. त्यामुळे येत्या काळात अनिल देशमुखांना जामीन मिळणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.
थोडक्यात बातम्या-
बंडखोर आमदार संतोष बांगर यांच्या यू-टर्ननंतर उद्धव ठाकरे आक्रमक, केली ‘ही’ मोठी कारवाई
गोव्याच्या राजकीय वातावरणात बिघाड, सोनिया गांधींनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल
‘नामांतराविषयी आमच्याशी चर्चा झाली नाही’, शरद पवारांचा खळबळजनक खुलासा
‘आज खऱ्या अर्थाने मी तणावमुक्त झालो’ -दिलीप वळसे पाटील
बंडखोर आमदारांविरोधातील याचिकेवर आज सुनावणी नाही?, अत्यंत महत्त्वाची समोर
Comments are closed.