स्टँडअप कॉमेडियन शो मधलं ‘ते’ वक्तव्य अन् आज मुनव्वरचा माफीनामा!

Munawar Faruqui l स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीने अखेर कोकणवासीयांची माफी मागितली आहे. कारण कॉमेडियन मुनव्वर फारुकीने त्याच्या स्टँडअप शो दरम्यान कोकण, महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांसाठी अपशब्द वापरले होते. त्यामुळे प्रचंड वाद वाढला होता. मुनव्वर यांच्या वक्तव्यावर शिवसेना शिंदे गट, भाजप आणि मनसेच्या नेत्यांनी तीव्र आक्षेप घेत मुनव्वरने माफी मागावी अशी मागणी केली होती. मात्र मुनव्वरने वाढता वाद पाहता आपल्या वक्तव्यावर माफी मागितली आहे.

मुनव्वर फारुकीने मागितली माफी :

मुनव्वर फारुकीने ‘एक्स’ या सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्या व्हिडिओमध्ये त्याने केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. तो म्हणाला की, “मी येथे काहीतरी खुलासा करण्यासाठी आलो आहे. काही काळापूर्वी एक कार्यक्रम झाला होता, ज्यामध्ये प्रेक्षकांशी संवाद साधला असता, कोकणाबद्दल माझ्याकडून अपशब्द समोर आले होते.”

तळोजा येथे कोकणातील बरेच लोक राहतात हे मला माहित आहे. कोकणातील माझे अनेक मित्रही तिथे राहतात, पण माझे शब्द संदर्भाबाहेर काढले गेले. एक स्टँडअप कॉमेडियन म्हणून माझा हेतू कोणालाही दुखावण्याचा नाही.

पुढे मुनव्वर फारुकी म्हणाला की, “लोकांना वाटतंय की त्याने कोकणची आणि कोकणात राहणाऱ्या नागरिकांची चेष्टा केली, पण माझा असा कोणताही हेतू नव्हता. मला कोणाच्याही भावना दुखावायच्या नव्हत्या. मात्र जर माझ्या बोलण्याने कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी सर्वांची जाहीर माफी मागतो.”

Munawar Faruqui l मुनव्वरच्या वक्तव्यामुळे राजकारणात एकच खळबळ :

शिवसेना आमदार सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान याने मुन्नावर फारुकीने कोकणवासीयांची माफी मागितली नाही, तर त्याला पायदळी तुडवले जाईल असा म्हणाला होता. एवढेच नाही तर समाधान सरवणकरने मुन्नावर फारुकीला जो व्यक्ती मारहाण करेल त्या व्यक्तीला तब्बल एक लाखाचे बक्षीस देऊ असे देखील सांगितले होते.

त्याचवेळी राज ठाकरेंच्या मनसेनेही मुनव्वर फारुकीने माफी मागावी असे म्हणले होते. तसेच माफी न मागितल्यास धडा शिकवू अशी धमकी देखील मनसेने दिली होती. मात्र आज मुनव्वर फारुकीने जाहीरपणे माफी मागितली आहे.

News Title : Munawar Faruqui Controversy

महत्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! सरकारने नगराध्यक्ष पदाचा कालावधी तब्बल ‘इतक्या’ वर्षांनी वाढवला

…असं झालं तर वाहनांची किंमत तब्बल 4 लाख रुपयांनी कमी होणार

“मी संसदेत प्रश्न मांडते तेव्हा मझ्या पतीला…”; सुप्रिया सुळेंचा अत्यंत गंभीर आरोप

“अजित पवार बारामतीत पराभूत होणार”; ‘या’ खासदाराने केली भविष्यवाणी

“आमची सत्ता आली तर लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवणार”