मुनव्वर फारुकीने दुसऱ्यांदा उरकलं लग्न?, ‘त्या’ फोटोमुळे चर्चेला उधाण

Munawar Faruqui Secretly Married Second time

Munawar Faruqui | मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) हा एक स्टँडअप काॅमेडियन आहे. तो नुकताच बिग बॉस 17 चा विजयी आहे. तो कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असलेला पाहायला मिळत आहे. आता देखील मुनव्वर त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी मुनव्वर फारूकीवर उपचार सुरू होते. सध्या त्याची प्रकृती स्थिर होती. अशातच आता स्टँडअप कॅमेडियन मुनव्वर फारुकीच्या (Munawar Faruqui) लव्ह लाईफबाबत आता धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.

मुनव्वर (Munawar Faruqui) हा केवळ स्टँडअप काॅमेडीयनच नाही तर तो एक सोशल मीडिया सेंसेशन देखील आहे. त्याची सोशल मीडियावर चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहते देखील मुनाव्वर याच्याबाबत अनेक गोष्टी जाणून घेण्याबाबत उत्सुक असल्याचं समजतंय.

आता मुनव्वरबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. मुन्नवर याने गुपचूप दुसरं लग्न केल्याची माहिती मिळत आहे. सध्या सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल होताना दिसत आहे. फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांना याचा धक्का बसला आहे. (Munawar Faruqui)

मुनव्वर यांने केलं दुसरं लग्न?

काही मीडिया रिपोर्टनुसार मुनव्वर याने दुसरं लग्न केल्याचं म्हटलं जातंय. मुनव्वर आता आनंदी आणि वैवाहिक जीवन जगत आहे. मुनव्वरने जवळपास 12 दिवसांआधी विवाह केल्याची माहिती समोर आली आहे. मुनव्वरच्या लग्न सोहळ्यात फक्त कुटुंबिय आणि मित्र-परिवार उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे.

मुनव्वरच्या पत्नीचं नाव काय?

मुनव्वचा दुसरा विवाह हा आयटीसी मराठा येथे झाला. मुनव्वरने कोणताही फोटो सोशल मीडियावर शेअर केला नाही. त्याला त्याचं लग्न गुप्त ठेवायचं आहे. तसेच त्याच्या पत्नीचं नाव हे मेहजबीन कोतवाला असल्याची माहिती समोर येत आहे. पाहायला गेलं तर स्वतः मुनव्वरने याबाबत काहीही जाहीर केलं नाहीये. मात्र, सोशल मीडियावर याच्या जोरदार चर्चा आहेत.

मेहबीज कोतवाल ही एक मेकअप आर्टिस्ट आहे. यावेळी विवाहासाठी अभिनेत्री हिना देखील उपस्थित होती. मुनव्वर आणि हिना हे चांगले मित्र आहेत. दोघांनी एकत्र काम देखील केलं आहे. दोघांचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

News Title – Munawar Faruqui Secretly Married Second time

महत्त्वाच्या बातम्या

लोकसभेच्या निकालानंतर गॅस सिलिंडर महाग होणार?; चर्चेला उधाण

मोबाईल वापरकर्त्यांना फटका! ‘या’ मोफत सेवा झाल्या बंद, मोजावे लागणार ‘इतके’ रुपये

बॉलीवुडचा ‘किंग खान’ दिवसाला किती कमावतो?; आकडा वाचून हैराण व्हाल

राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पावसाने घातला धुमाकूळ; पाच जणांचा मृत्यू

राज ठाकरे धुमाकूळ घालणार? पदवीधर निवडणुकीत मनसेची उडी

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .