खेळ

मुंबईचा तडाखा; चेन्नईला पराभूत करत पाचव्यांदा अंतिम फेरीत

मुंबई | प्लेऑफच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नईवर सहज विजय प्राप्त केला आहे. 132 धावांचा पाठलाग करताना मुंबईने 6 गडी राखून चेन्नईला पराभूत केले.

प्रथम फलदांजी करताना चेन्नईची सुरुवात चांगली झाली नाही. शेवटी अंबाती रायडूच्या नाबाद 42 तर कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नाबाद 37 धावांच्या जोरावर चेन्नईने 132 धावांचा पल्ला गाठला.

मुंबईचीही सुरुवात खास झाली नाही. कर्णधार रोहीत शर्मा पहिल्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर पायचीत झाला. मात्र सुर्यकुमार यादवने केलेल्या नाबाद 71 धावांच्या जोरावर मुंबईने विजय मिळवला.

दरम्यान, या विजयामुळे मुंबईने पाचव्यांदा अंतिम फेरी गाठली असून चेन्नईला अंतिम सामन्यात प्रवेश करण्यासाठी आणखी एक संधी मिळणार आहे.

महत्वाच्या बातम्या

-राजीव गांधींवरील वक्तव्याप्रकरणी नरेंद्र मोदींना क्लीन चिट

-अशोक चव्हाण ‘आदर्श’चा बदला काँग्रेस पक्ष संपवून घेत आहेत- नितेश राणे

-नरेंद्र मोदींना आत्तार्यंत कोणकोणत्या प्रकरणी मिळालं क्लीन चीट!

-केंद्राकडून दुष्काळ निवारणासाठी महाराष्ट्राला आणखी 2160 कोटी रूपयांची मदत

-फाईनलचं तिकीट कोण मिळवणार? पहिला क्वालिफायर सामना आज

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या