Dhananjay Munde l बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी राजीनामा दिला असला, तरी हा विषय इथेच संपत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी धनंजय मुंडेंना संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि आवादा कंपनीकडे मागितलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात सहआरोपी करण्याची मागणी केली आहे.
“फक्त राजीनामा पुरेसा नाही, धनंजय मुंडेंना सहआरोपी करा” :
रोहित पवार ट्विट करत म्हणाले की, “मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा लोकांच्या संतापाचा आणि देशमुख कुटुंबाच्या संघर्षाचा परिणाम आहे. पण केवळ राजीनामा दिला म्हणून हा विषय संपणार नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आणि आवादा कंपनीकडे मागितलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात त्यांना सहआरोपी करून पारदर्शक तपास करण्याची गरज आहे. तसेच, सुधारित चार्जशीट दाखल करावी. आम्ही सरकारला यासाठी भाग पाडू!” असे म्हणाले आहेत.
दरम्यान, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतरही राज्यभरात संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आक्रोश सुरू आहे. लातूर, बीड, धाराशिव या भागांत आंदोलने सुरू असून, धनंजय मुंडेंना सहआरोपी करावे, अशी जोरदार मागणी होत आहे. त्यामुळे सरकारवर आणखी दबाव वाढण्याची शक्यता आहे.
मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा सामान्य लोकांच्या मनातील संतापाच्या उद्रेकाचा आणि देशमुख कुटुंबाच्या संघर्षाचा परिणाम आहे. पण केवळ राजीनामा दिला म्हणून हा विषय इथंच संपत नाही, तर संतोष देशमुख खून प्रकरणी आणि आवादा कंपनीकडे मागितलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात त्यांना सहआरोपी करून…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 4, 2025
Dhananjay Munde l “धनंजय मुंडेंना मंत्रीपदच मिळू नये” – पंकजा मुंडे :
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या भगिनी आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनीही प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, “धनंजय मुंडे यांचा राजीनामा फार आधी व्हायला हवा होता.
तसेच मी या निर्णयाचे स्वागत करते. पण या राजीनाम्यापेक्षा त्यांना मंत्रिपदाची शपथच मिळायला नको होती.” अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडेंनी दिली आहे.