धनंजय मुंडेंचा देशमुख हत्याप्रकरणाशी संबंध नाही, राष्ट्रवादीकडून पत्रक जारी!

Ajit Pawar

Dhananjay Munde Resigned l बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर आणि अत्यंत क्रूर फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यभर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. वाढत्या राजकीय दबावामुळे अखेर मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आपला मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP) अधिकृत पत्रक जारी करत स्पष्ट केले की, धनंजय मुंडेंचा या हत्याप्रकरणाशी कोणताही संबंध नाही आणि त्यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावरून राजीनामा दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका :

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी राजीनाम्याबाबत भूमिका स्पष्ट करताना म्हटले, “धनंजय मुंडे यांचा हत्याप्रकरणाशी थेट संबंध असल्याचे तपासात सिद्ध झालेले नाही. मात्र, एक जबाबदार राजकीय नेता म्हणून त्यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. आमचा पक्ष सुरुवातीपासूनच दोषींवर कठोर कारवाई होण्याच्या मागणीवर ठाम राहिला आहे. तपास कोणत्याही दबावाशिवाय सुरू असून, आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, ही आमची भूमिका आहे.”

तटकरे यांनी पुढे सांगितले, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कधीही कोणत्याही गुन्हेगारी कृत्याचे समर्थन करणार नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी यापूर्वीही नैतिकतेच्या मुद्द्यावर स्वतः राजीनामा देण्याचे उदाहरण निर्माण केले आहे. न्याय व्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास असून, आम्ही कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करणार नाही.”

Dhananjay Munde Resigned l धनंजय मुंडेंची भूमिका स्पष्ट :

धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्यानंतर त्यावर स्पष्टीकरण देत म्हटले, “संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून मन व्यथित झाले. माझ्या प्रकृतीच्या कारणास्तव डॉक्टरांनी काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे मी वैद्यकीय कारणास्तवही राजीनामा दिला आहे.”

मात्र आता धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर विरोधकांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या असून, त्यांचा हा राजीनामा उशिराने घेतला गेला आहे आणि तो हत्येतील सहभागाची अप्रत्यक्ष कबुली आहे, असा आरोप केला जात आहे. तसेच, मराठा समाजाने धनंजय मुंडेंना या प्रकरणात सहआरोपी करावे, अशी मागणी करत आंदोलन सुरू ठेवले आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत या प्रकरणावर मोठे राजकीय नाट्य घडण्याची शक्यता आहे.

News title : Munde Resigned on Moral Grounds, Not Involved in Murder Case

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .