बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘दादांच्या पोटातलं ओठावर आलं’; ‘या’ मुद्दयावरून अजित पवार देवेंद्र फडणवीसांमध्ये जुंपली

मुंबई | महाराष्ट्रातील अर्थसंकल्पीय अधिवेशन आज सुरू झालं. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक आमने- सामने आल्याचं पहायला मिळालं. पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांवर चौफेर टीका केली आहे. तर भाजप नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी वैधानिक विकास मंडळावरून सरकारला घेरलं. याला उत्तर देत उपमुख्यमंत्री अजित पवार दोघांना टोले लगावले आहेत.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस हा वैधानिक विकास मंडाळावरून रंगला. वैधानिक विकास मंडाळाची पुर्णस्थापना का केली नाही?. 72 दिवस झाले तरी सरकार वैधानिक विकास मंडाळ का स्थापन करत नाही. मराठवाडा आणि विदर्भावर हे सरकार अन्याय करत आहे, अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

वैधानिक विकास मंडाळांची स्थापना करू आणि बजेटमध्ये त्यासाठी निधी सुद्धा देऊ. ज्या दिवशी 12 आमदारांची नावं जाहीर करतील त्याच दिवशी वैधानिक विकास मंडाळाची स्थापना करू, असं अजित पवार म्हणाले. यानंतर फडणवीसांनी आक्रमक झाले.

वैधानिक विकास महामंडळ हा आमचा हक्क आहे. आम्ही भीक मागत नाही. आम्ही भिकारी नाही. वैधानिक विकास महामंडळ करा किंवा करू नका, ते आमच्या हक्काचं आहे, आम्ही मिळवून घेऊच, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

पाहा व्हिडीओ-

 

थोडक्यात बातम्या-

“नाना पटोले फार हुशार आहेत, श्रेय घेण्यासाठी नाना पटोलेंची हुशारी”

‘…तर आम्ही एक मिनिटही बसणार नाही’; सभागृहात फडणवीस आक्रमक

‘पूजा चव्हाणच्या आई-वडिलांनी इतके कोटी रूपये घेतले’; शांता राठोडांचा मोठा गौप्यस्फोट-

शिवसेनेचा आणखी एक नेता भाजपच्या रडारवर?; किरीट सोमय्यांच्या त्या ट्विटने खळबळ

संजय राऊतांनी केलं राहुल गांधींचं कौतुक, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More