बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्राच्या सत्तानाट्यात ‘ही’ आहे भाजपची भूमिका, मुनगंटीवार म्हणतात…

मुंबई | एकनाथ शिंदे व शिंदे गटातील आमदारांच्या बंडाळीनंतर महाराष्ट्रात सत्तासंघर्ष पाहायला मिळत आहे. राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं असताना या सत्तानाट्य भाजपची भूमिका काय असणार, असा प्रश्न उपस्थित केला जात होता.

एकनाथ शिंदेंच्या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने बंडखोर आमदारांना दिलासा दिल्यानंतर भाजपच्या हालचालींना वेग आला. आज भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. यानंतर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे.

एकनाथ शिंदेंकडून भाजपला अद्याप कुठलाही प्रस्ताव आला नसल्याचं मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं आहे. तर भाजपची सध्याची भूमिका ही वेट अँड वॉचची असल्याचं वक्तव्य मुनगंटीवार यांनी केलं आहे. तर जशी परिस्थिती बदलेल तसं आम्ही बैठका घेऊन निर्णय घेऊ, असंही मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, 12 जुलैपर्यंत बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई करता येणार नाही, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तर बंडखोर आमदारांच्या सुरक्षेची जबाबदारी ही राज्याचीच आहे, असंही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

शिंदे-ठाकरेंमध्ये सत्तासंघर्ष सुरु, इकडे दोन कलाकारांमध्ये वातावरण पेटलं!

शिवसेनेला आणखी एक झटका!, माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांचं मोठं वक्तव्य

मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाचा महाविकास आघाडीला झटका

“महाराष्ट्रात असता तर कोणत्याही बिळातून फरफटत आणलं असतं”

“मुंबईत घुसू देणार नाही, 72 तास मुंबई विमानतळाला घेराव घालू”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More