आरोपांमुळे मुनगंटीवार संतापले; निरुपमांवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार

चंद्रपूर | काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर केलेले आरोप मुनगंटीवारांनी फेटाळून लावले आहेत. निरुपमांवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं मुनगंटीवारांनी म्हटलं आहे. 

तस्करांसोबत जोडलेले माझे संबंध म्हणजे राजकीय हीनता आहे. इतक्या खालच्या स्तराला जाऊन तथ्यहीन आरोप मी आजवर राजकीय आयुष्यात बघितले नाहीत, असं मुनगंटीवार यांनी म्हटलं. 

निरुपम यांनी सत्याचा निर्घृण खून केला आहे, असा घणाघातही त्यांनी केला. 

दरम्यान, मुनगंटीवार जेव्हापासून वनमंत्री झालेत तेव्हापासून वाघांच्या मृत्यूची संख्या वाढली आहे, त्यावरून मुनगंटीवारांचे शिकार करणाऱ्या आंतरराष्ट्रीय माफियांच्या टोळीशी साटंलोटं असल्याची टीका निरुपमांनी केली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

-मुनगंटीवारांना वाघ मारण्यातच जास्त रस आहे; संजय निरुपमांचा आरोप

-संजय दत्तने छायाचित्रकारांना हासडल्या अत्यंत घाणेरड्या शिव्या

-#MeToo | नवाजुद्दीनने मला जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला!

-आग्र्याचं नाव बदलून अग्रवाल ठेवा; भाजप आमदाराची मागणी

-दिवाळी संपताच घरगुती गॅस सिलिंडर आणखी 2 रुपयांनी महागला

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या