बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शिवसेनाप्रमुखांचं नाव देण्याचा युती पुन्हा जुळण्याशी संबंध नाही, एकत्र येऊ तेव्हा येऊ”

चंद्रपूर | स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलाचं माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. मात्र शिवसेनाप्रमुखांचं नाव देण्याचा अन् युती पुन्हा जुळण्याशी काहीही संबंध नाही. एकत्र येऊ तेव्हा येऊ, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

चंद्रपूर शहराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या जुना वरोरा नाका चौकातील रेल्वे उड्डाणपुलाचं शिवजयंतीच्या मुहूर्तावर उद्घाटन करण्यात आलं. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, असं याचं नामकरण करण्यात आलं आहे.

आम्ही सत्तेत सोबत नसलो तरी शिवसेना आणि भाजप यांच्या विचारातील समानता कोणाी तोडू शकत नाही, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, काही नेते पक्ष किंवा सत्तेपेक्षा जास्त उंच असतात. त्यांचा विचार आकाशाने हेवा करावा इतका मोठा असतो, बाळासाहेब ठाकरे  जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्यात यशस्वी ठरले होते, असं मुनगंटीवार म्हणाले होते.

ट्रेंडिंग बातम्या- 

मल्लखांबच्या माध्यमातून शिवरायांना अनोखी मानवंदना, हा व्हिडीओ पाहाच…

इंदोरीकर महाराजांनी थोडा संयम ठेवावा- राधाकृष्ण विखे पाटील

महत्वाच्या बातम्या- 

शरद पवारांशी बाँडिंग असलेल्या भाजप नेत्यांची घरवापसी होणार- छगन भुजबळ

‘संभव हो तो जाने से पहले एक बार जरुर मिलना’, भाजपचा मेसेज डावलून ‘हा’ नेता शिवसेनेत!

इंदोरीकरांच्या समर्थनार्थ रविवारी ‘हा’ तालुका बंद!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More