…तर ‘अवनी’च्या मृत्यू प्रकरणी उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली समिती नेमू!

चंद्रपूर | अवनी वाघिणीच्या मृत्यू प्रकरणी काही चुकीचे किंवा शंकास्पद असेल तर आम्ही उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमू शकतो, असं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

उद्धवजी युती सरकारचे महत्वाचे नेते आहेत. चौकशी समितीचे प्रमुखपद त्यांनी न स्वीकारल्यास सुप्रीम कोर्टाच्या 5 निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी समिती नेमण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केल्याचं त्यांनी सांगितलं. 

विनाकारण या प्रकरणात हीन दर्जाचे राजकारण केले जात आहे, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. 

दरम्यान, अवनी वाघिणीच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-सैनिकांच्या सर्जिकल स्ट्राईकचं श्रेय घेता; तसं अवनीच्या मृत्यूचं पापही घ्या!

-आरोपांमुळे मुनगंटीवार संतापले; निरुपमांवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार

-मुनगंटीवारांना वाघ मारण्यातच जास्त रस आहे; संजय निरुपमांचा आरोप

-संजय दत्तने छायाचित्रकारांना हासडल्या अत्यंत घाणेरड्या शिव्या

-#MeToo | नवाजुद्दीनने मला जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या