बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अजित पवारांकडून एकदा चूक झाली, तुम्ही सारखं सारखं बोलणार का?”

मुंबई | राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सत्ताधारी महाविकास आघाडी (MVA Government) आणि भाजपमध्ये (BJP) जोरदार जुगलबंदी पहायला मिळाली आहे. विविध मुद्द्यांवरून महाविकास आघाडी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये खटके उडत आहेत. अशातच सपाचे आमदार अबू आझमीच्या (SP MLA Abu Azhami) एका प्रश्नानं सत्तास्थापनेच्या 2019 च्या आठवणी जाग्या झाल्या. यावरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (BJP Leader Sudhir Mungantiwar) यांनी सरकारला चांगलंच घेरलं आहे.

अबु आझमी यांनी मुस्लीम आरक्षणाचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला होता. त्यावर सरकारतर्फे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी चर्चा करण्यास सुरूवात केली. यादरम्यान सरकार आणि विरोधकांमध्ये जोरदार घमासान झालं. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारवर आणि नवाब मलिक यांच्यावर जोरदार टीका केली. नवाब मलिक यांना अधिकार असता तर रात्रीत आरक्षण दिलं असतं, असं मुनगंटीवारणा म्हले आहेत.

यावर सत्ताधारी गटाकडून रात्रीचा खेळ आम्ही करत नाहीत, अशी टीका भाजपवर करण्यात आली. इतक्यात सुधीर मुनगंटीवार यांनी 2019 च्या सत्तस्थापनेची आठवण काढत अजित पवार यांच्याकडून एकदा चूक झाली म्हणून तुम्ही वारंवार असं बोलणार का?, असा सवाल मलिक यांना विचारल्यानं सर्वत्र गोंधळ माजला होता.

दरम्यान, अजित पवार हे आमचे जवळचे मित्र आहेत, असा उपहासात्मक टोला ही मुनगंटीवार यांनी अजित पवार यांना लगावला आहे. परिणामी हिवाळी अधिवेशनात असो किंवा अन्य कुठं असो अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधीला कोणी विसरलं नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.

थोडक्यात बातम्या 

हिवाळी अधिवेशन: आदित्य ठाकरेंना आलेल्या धमकीवर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

‘पवार साहेबांमुळे शिवसेनेने भाजपला योग्य जागा दाखवली’; रूपाली ठोंबरेंचा घणाघात

“…तर विधानभवनाच्या पायऱ्यांवर नाक घासून माफी मागेन”

करुणा धनंजय मुंडे यांची नवी घोषणा, उचललं ‘हे’ मोठं पाऊल

“लाज न लज्जा,…तरीही रिकामटेकडे मलिक बिनबुडाचे आरोप करतायेत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More