बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वापरलेल्या मास्कची पायपुसणी, धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यावर महापालिकेची कारवाई!

नांदेड | कोरोनाचं सावट आता कमी होताना दिसत आहे. त्यामुळे हळूहळू कोरोना नियम शिथिल होत आहेत. मात्र तरीही संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्यानं नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितलं जात आहे. अशातच आता नांदेडमधून धक्कादायक प्रकार समोर येत आहे.

कोरोनाचा प्रसार जास्त होऊ नये म्हणून मास्क घालणं अनिवार्य केलं आहे. मात्र हे मास्क वापरुन झाल्यावर ते कुठेही फेकून दिलं जातं. याच मास्कचा वापर करत नांदेडमध्ये पायपुसणी तयार करण्यात आली आहे. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यावर महापालिकेच्या पथकानं या पायपुसणी जप्त केल्या.

वेगवेगळ्या मास्कचा वापर करत नांदेडमधील लोकांनी या पायपुसणी तयार केल्या होत्या. यामध्ये कापडी मास्क, सर्जिकल मास्क, अशा वेगवेगळ्या मास्कचा वापर करण्यात आला होता.

दरम्यान, नांदेडमध्ये पायपुसणी जप्त केल्यानंतर महामालिकेच्या पथकानं चौकशी केली. यात त्यांना या पायपुसण्या दिल्लीतून आणल्या असल्याचं समजलं. आता याविषयी आणखी तपास सुरु आहे.

थोडक्यात बातम्या – 

मोठी बातमी! भारतात 2 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीला मान्यता

“मला असं वाटतं मी आजही मुख्यमंत्रीच आहे..”; फडणवीसांच्या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण

वारकरी सांप्रदायाला पैसा प्रसिद्धीची गरज नाही- शिवलीला पाटील

महाविद्यालये सुरु करण्याबाबत उदय सामंत यांनी दिली महत्त्वाची बातमी

72 तास अन्नत्याग आंदोलनकर्त्या शेतकऱ्याची तब्येत खालावली

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More