बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“चेंबूरमधील दुर्घटनेला महापालिकेचा निष्काळजीपणाच कारणीभूत”

मुंबई | आज सकाळी चेंबूरमध्ये मुसळधार पाऊस पडल्यामुळे काही घरांवर संरक्षक भिंत कोसळली. त्यामध्ये 17 लोकांचा मृत्यू झाला आहे. या धक्कादायक दुर्घटनेमुळे राज्यात खळबळ माजली आहे. या घटनेवरून राज्यातील विरोधी पक्षनेत्यांनी पुन्हा सरकारवर टीका करायला सुरूवात केली आहे. अशातच भाजप पक्षाचे नेते अशिष शेलार यांनी एक वक्तव्य केलं आहे.

घडलेल्या घटनेमुळे अशिष शेलार यांनी मुंबई महापालिकेवर टीका केली आहे. महापालिकेच्या निष्काळजीपणामुळेच आजची चेंबूरमध्ये घडलेली दुर्घटना घडली आहे. मुंबई महापालिका मुंबईकरांच्या जीवाशी खेळत आहे, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. अशिष शेलार यांनी आज वाशीनाका येथे जाऊन दुर्घटनाग्रस्त भागाला भेट दिली. प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

मी महापौरांवर बोलणं टाळत आहे. या ठिकाणी राजकारण करण्याची गरज नाही, असंही ते म्हणाले आहेत. डोंगर पायथ्याशी राहणाऱ्या लोकांना महापालिकेने पूर्वसूचना दिली होती का? त्यामुळे महापौरांचा अभ्यास कच्चा असल्याचं दिसून येत आहे. आज घडलेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचं त्यांनी म्हटलं.

या दुर्घटनेबद्दल आपण संवेदना प्रकट केल्या आहेत. ते ठिक आहे. पण या लोकांना सावरण्यासाठी सर्वांनी पुढे आलं पाहिजे. जे सत्तेत आहेत त्यांनी काही निर्णय घेतला की नाही हा महत्त्वाचा मुद्दा असल्याचं शेलारांनी सांगितलं. तसेच महापालिकेने या नागरिकांचं पुनर्वसन करावं. त्यांची राहण्याची व्यवस्था करावी. धोकादायक भिंत काढावी. राज्य सरकारनेही मदत करायला हवी.

थोडक्यात बातम्या-

“दोन्ही पक्षांना याचा विसर पडू देऊ नका की, काँग्रेसमुळे आपण सत्तेत आहात”

सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री; इंधन दरवाढ सुरूच

“2024 ची वाट पाहावी लागणार नाही, मोदी सरकार लवकरच कोसळणार”

आम्ही जर रयत संघटना आणि इतरांना मान देऊ शकतो, तर…- चंद्रकांत पाटील

आनंदाची बातमी! देशातील वाढणारी कोरोना रुग्णसंख्या अखेर आली आटोक्यात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More