बहुचर्चित ‘मुंज्या’चा थरार आता ओटीटीवर दिसणार; कधी आणि कुठे पाहणार?

Munjya Ott Release | आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘मुंज्या’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात शर्वरी वाघ हीची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट खूप गाजत आहे. कलाकारांच्या भूमिकेचं तर प्रेक्षक भरभरून कौतुक करत आहेत. आता हा चित्रपट लवकरच ओटीटीवर येणार आहे.

‘मुंज्या’ हा चित्रपट ओटीटीवर कधी येणार, याबद्दलची माहिती समोर आली आहे. ‘मुंज्या’ हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे डिजिटल राइट्स हॉटस्टारने विकत घेतले आहेत. दोन महिन्यांनंतर चित्रपट ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीस येईल.

‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार ‘मुंज्या’

या चित्रपटात अभय वर्मा आणि शर्वरी वाघ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाने आतापर्यंत 80 कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवला आहे. अजूनही चित्रपट चांगला (Munjya Ott Release ) गल्ला कमावू शकतो, असं म्हटलं जातंय.

हा चित्रपट आदित्य सरपोतदार यांनी दिग्दर्शित केला आहे. त्यांनी ‘फास्टर फेणे’, ‘झोंबिवली’, ‘उनाड’ यांसारखे चित्रपट बनवले आहेत. ‘स्त्री’ आणि ‘भेडिया’नंतर ‘मुंज्या’ हा त्याच हॉरर-कॉमेडी मालिकेतला तिसरा चित्रपट आहे. हे तिन्ही चित्रपट सुपरहीट ठरले आहेत.

बॉक्स ऑफिसवर ‘मुंज्या’ची चांगली कमाई

जगभरात मुंज्याने आतापर्यंत 83.46 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. लवकरच चित्रपट 100 कोटींचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे. फक्त 30 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट प्रचंड गाजला आहे. यामध्ये भाग्यश्री लिमये, अजय पूरकर, सुहास जोशी, मोना सिंग, अभय वर्मा आणि शर्वरी वाघ यांच्याही भूमिका आहेत.

हा चित्रपट आता प्रेक्षकांना ओटीटीवर (Munjya Ott Release ) देखील पाहता येईल. मात्र. त्यासाठी अजून तरी दोन महीने वाट बघावी लागणार आहे. चित्रपट रिलीज होऊन 11 दिवस झाले आहेत आणि अजूनही चित्रपटाने आपली जादू कायम ठेवली आहे.

News Title- Munjya Ott Release  

महत्त्वाच्या बातम्या –

यंदा वटपौर्णिमा 4 दुर्मिळ योगायोगाने साजरी करा; होणार दुहेरी लाभ

रिल्सच्या नादात जीवघेणा स्टंट; तरूणीचा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ व्हायरल

“पाच महिन्याची गरोदर आहेस, हे शोभतं का तुला?”; दीपिकाच्या ‘त्या’ कृत्यावर नेटकरी भडकले

“अजितदादा थोडे दिवस महायुतीत आले नसते तर चाललं असतं”

“उज्ज्वल निकम यांची सरकारी वकीलपदी नियुक्ती लोकशाहीसाठी घातक”