बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबईतून ‘मुन्नाभाई’ला अटक; महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई

मुंबई | देशात दहशतवादी हल्ल्या कट रचण्याचा प्रयत्न करणाऱ्या 6 जणांना दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. आता आणखी एका संशयित दहशतवाद्याला मुंब्रातुन अटक करण्यात आली आहे. एटीएस आणि मुंबई पोलिसांना यश मिळालं आहे. महाराष्ट्र एटीएसने मुंबईतून आणखी एका संशयित दहशतवाद्याला ताब्यात घेतल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

मुन्नाभाई उर्फ इमरान असे अटक करण्यात आलेल्या संशयित दहशतवाद्याचं नाव आहे. इमरानचा रेल्वे स्थानकावर गर्दीच्या ठिकाणी बाॅम्बस्फोट करण्याचा प्रयत्न होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. तसेचं गुप्तचर यंत्रणांनी अलर्ट केल्यावर एटीएसने छापा टाकला असताना मुन्नाभाई उर्फ इमरान अटक करण्यात आली आहे. एटीएस संपूर्ण देशभरात छापमारी करत असून दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळत आहे.

ज्यावेळेस गुप्तचर यंत्रणांनी पोलिसांना सतर्क केलं होतं, त्यावेळेस रेल्वे स्थानकावर सुरक्षा वाढवण्यात आली. मुंबईत काही रेल्वे स्थानकावर गेट देखील बंद करण्यात आले. त्यानंतर ही कारवाई करण्यात एटीएस अधिकाऱ्यांना यश मिळालं. बाॅम्बस्फोट करण्याचा कट रचणाऱ्या झाकीर हुसैन याला अटक करण्यात आली होती. पोलिसांनी झाकीरची कसून चौकशी केल्यानंतर इमरानला पकडण्यात आलं आहे.

दरम्यान, मुन्नाला अटक केल्यानंतर एटीएस कोर्टात हजर करण्यात येणार आहे. दिल्ली पोलिसांच्या कारवाईनंतर आतापर्यंत देशभरात अनेक दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेमुळे संभाव्य धोके टळले असल्याचं दिसत आहे.

थोडक्यात बातम्या-

कोण आहेत मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी? जाणून घ्या संपूर्ण माहिती

‘…अन्यथा किरीट सोमय्यांना जन्माची अद्दल घडेल’; हसन मुश्रीफांचा पलटवार

‘किरीट सोमय्या आंतकवादी आहेत का?’; चंद्रकांत पाटलांचा संतप्त सवाल

मोठी बातमी! कायरन पोलार्ड करणार मुंबईचं नेतृत्व; रोहित, हार्दिक संघाबाहेर

इवेन्ट ख़त्म! 17 सप्टेंबरच्या लसीकरणावरून राहुल गांधींचा मोदी सरकारला टोला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More