UPSC परीक्षेत मुन्नाभाई स्टाईल कॉपी, आयपीएस अधिकाऱ्याला अटक

चेन्नई | यूपीएससी परीक्षेत मुन्नाभाई स्टाईल कॉपी केल्याचं प्रकरण उजेडात आल्यानं देशाच्या प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडालीय. साफीर करीम असं या विद्यार्थ्याचं नाव असून धक्कादायक बाब म्हणजे तो आयपीएस अधिकारी आहे. 

साफीरला आयएएस बनायचं होतं. मुख्य परीक्षेवेळी तो ब्ल्यूटूथद्वारे पत्नीच्या संपर्कात होता. त्यावेळी त्याला रंगेहाथ पकडण्यात आलं. 

साफीर सध्या तामिळनाडूच्या तिरुनेलवेल्ली जिल्ह्याचा सहाय्यक पोलीस अधीक्षक आहे, मात्र आता त्याला आणि त्याच्या पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.