मुरलीधर मोहोळांना पहिल्याच टर्ममध्ये लागली मंत्रि‍पदाची लॉटरी!

 Muralidhar Mohol | पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा विजय झाला आणि ते पुण्याचे नवनिर्वाचित खासदार झाले. पुणे लोकसभा मतदारसंघात तिहेरी लढत झाली होती. यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे होते. तसेच भाजपमधून मुरलीधर मोहोळ  (Muralidhar Mohol) यांना उमेदवारी दिली. तसेच काँग्रेस पक्षाचे नेते रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली होती. यामध्ये मुरलीधर मोहोळ  (Muralidhar Mohol) यांनी विजय मिळवला. अशातच मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांना मंत्रीपदाची लॉटरी लागली असल्याची माहिती समोर आली आहे.

मुरलीधर मोहोळ यांना मंत्रीपद

मुरलीधर मोहोळ  (Muralidhar Mohol) हे पहिल्याच टर्ममध्ये पुणे मतदारसंघाचे खासदार झाले. त्यानंतर त्यांना मंत्रीपद देण्यात येणार आहे. तसेच रावेर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार आणि खासदार रक्षा खडसे यांना देखील मंत्रीपद देण्यात येणार आहे. एकाबाजूला एकनाथ खडसे हे भाजपमध्ये होते. त्यांच्यातील भाजपमधील अंतर्गत धुसफूशीमुळे त्यांनी पक्ष सोडून शरद पवारांना साथ दिली. भाजपमध्ये एकनाथ खडसे असताना देखील त्यांना मंत्रीपद देण्यात आलं नाही. मात्र सूनबाई रक्षा रक्षा खडसेंना मंत्रीपद दिल्याचं समजतंय.

आता रक्षा खडसे या त्यांच्या वैयक्तिक विमानाने दिल्लीला रवाना झाल्या आहेत. तसेच मुरलीधर मोहोळ यांना देखील पंतप्रधान कार्यलयातून फोन आला होता. त्यांचा मंत्रीमंडळात समावेश होणार आहे. मुरलीधर मोहोळ हे प्रथमच पुण्यातून खासदार झाले आहेत. मुरलीधर मोहोळ यांची महापौर ते मंत्रीपद अशी कारकीर्द असणार आहे.

तसेच मुरलीधर मोहोळ यांना मंत्रीपद देण्यामागील कारण देखील समोर आलं आहे. मुरलीधर मोहोळ यांना मंत्रीपद देण्याचं कारण आता समोर आलं आहे. भाजपने मुरलीधर मोहोळ यांना मंत्रीपद दिलं कारण की, पश्चिम महाराष्ट्रात भाजप कमकुवत आहे. महाविकास आघाडीने पश्चिम महाराष्ट्रात विजय मिळवला आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र भाजपच्या बाजूने कसा होईल यामुळे आता मुरलीधर मोहोळ यांना मंत्रीपद देण्यात आलं आहे.

रक्षा खडसे यांना मंत्रीपद

दरम्यान मुरलीधर मोहोळ यांच्याप्रमाणे रक्षा खडसे यांना देखील मंत्रीपद देण्यात आलं आहे. याआधी रक्षा खडसे यांचे सासरे भाजपमध्ये होते. आता रक्षा खडसे या विमानातून दिल्लीला रवाना झाल्या आहेत.

रक्षा खडसे यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर एकनाथ खडसे हे भावूक झाले आहेत. त्यांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. कुटुंबातील एक सदस्य मंत्रीमंडळामध्ये जात आहे याचा आनंद गगनाला मावेनासा झाला आहे. त्या केंद्रात मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याने माझं हृदय भरून आलं.

News Title – Muralidhar Mohol Minister In Modi Cabinet

महत्त्वाच्या बातम्या

“जो मराठा समाजाला त्रास देणार त्याला विधानसभेत…”, मनोज जरांगेंची तोफ कडाडली

“पुणेकरांना समुद्र नसल्याची खंत होती, म्हणून भाजपाने पुण्यात समुद्रही आणून दाखवला”

शिंदेंच्या ‘या’ खासदाराला आला मंत्रिपदासाठी फोन, अजित पवारांचा गट अजून वेटिंगवर

मंत्रिपदाची हंडी फुटली!, महाराष्ट्रातील ‘या’ 5 नेत्यांना मंत्रिपदासाठी आले फोन

‘या’ राशीच्या व्यक्तींचं आज भाग्य उजळणार, नव्या संधी आयुष्य बदलतील