Muralidhar Mohol | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत 72 मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला आहे. यामध्ये पुणे लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांचा देखील मंत्री म्हणून समावेश झाला आहे. पुण्याला मंत्रीपद मिळाल्यानंतर बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांच्यावर टीका केली. त्यावर मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांना सुप्रिया सुळे यांनी डिवचलं आहे. पहिल्यांदा पुण्याला मंत्रीपद आलं आहे. चांगली गोष्ट आहे. मात्र या मंत्रीपदाचा कंत्राटदारांना फायदा होता न होता, सर्व लोकांना याचा फायदा व्हावा, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. त्याला आता मुरलीधर मोहोळांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
मुरलीधर मोहोळांचं सुळेंना प्रत्युत्तर
सुप्रिया सुळेंनी मुरलीधर मोहोळ यांचं अभिनंदन केलं आहे. त्यावर मुरलीधर मोहोळ यांनी देखील मनपूर्वक धन्यवाद म्हटलं आहे. मात्र त्यानंतर त्यांनी ट्विटद्वारे सुप्रिया सुळेंवर पलटवार केला आहे. त्यांनी म्हटलं की, “खरं तर जवळपास 40 वर्षांनंतर जनतेतून निवडून आलेल्या पुण्याच्या खासदाराला मंत्रीपदाची संधी मिळाली. ही बाब समस्त पुणेकरांना गौरवान्वित करणारी आहे आणि पुण्याची राजकीय संस्कृती पाहिली तर यांचं निखळ मनानेच स्वागत अपेक्षित होतं. असो पण या निमित्ताने आपल्या कोत्या मनोवृत्तीचं दर्शनही पुणेकरांना घडलं.”
मा. सुप्रियाताई,
शुभेच्छांबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद !खरं तर जवळपास ४० वर्षांनंतर जनतेतून निवडून आलेल्या पुण्याच्या खासदाराला मंत्रीपदाची संधी मिळाली. ही बाब समस्त पुणेकरांना गौरवान्वित करणारी आहे आणि पुण्याची राजकीय संस्कृती पाहिली तर यांचं निखळ मनानेच स्वागत अपेक्षित होतं.…
— Murlidhar Mohol (Modi Ka Parivar) (@mohol_murlidhar) June 10, 2024
“सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्यांना लवकर पचणी पडणारं नाही”
“ताई, आपली मळमळ आम्ही समजू शकतो. माझ्यासारख्या सामान्य घरातील कार्यकर्त्याला थेट केंद्रीय मंत्रीपदावर संधी मिळणे, हे आपल्यासारख्या सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्यांना लवकर पचणी पडणारे नाही. त्यामुळे आपली टिपण्णी स्वाभाविक मानतो
“उरला प्रश्न ठेकदारांचा, तर ठेकेदार कोणी पोसले? कोणी मोठे केले? पुण्यातील आणि महाराष्ट्राचे मोठे ठेकेदार कोणाचे पार्टनर आहेत? हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे असल्या तकलादू टिपण्णी करुन स्वतःचं हसं सोडून दुसरं काही होणार नाही,” असं ट्विट मुरलीधर मोहोळ यांनी केलं आहे.
News Update – Muralidhar Mohol Replied To NCP MLA Supriya Sule
महत्त्वाच्या बातम्या
दोन जिवलग मित्रांनी एकत्र संपवलं जीवन, थरकाप उडवणारी घटना आली समोर
पुणेकरांनो सावधान! पुढील 24 तास धोक्याचे, हवामान विभागाने वर्तवला अंदाज
मुंबईत मान्सूनचं जोरदार आगमन, ‘या’ भागांना येलो अलर्ट
“स्तनांचा आकार वाढवण्यासाठी…”; प्रसिद्ध अभिनेत्रीचा अत्यंत धक्कादायक खुलासा
अभिनेत्रीने वयाच्या 37 व्या वर्षी संपवलं आयुष्य, पोलिसांना वेगळाच संशय!