Top News पुणे महाराष्ट्र

पुण्यात पुन्हा लाॅकडाऊन होणार का?; मुरलीधर मोहोळ म्हणाले…

Photo Credit- Facebook/ Muralidhar Mohol

पुणे| राज्यात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. पुण्यासोबतच संपुर्ण महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. यामुळे प्रशासन देखील या आकडेवाडीवर नजर ठेऊन आहे. पुण्यात निर्बंध शिथील केल्यानंतर कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे पुण्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन पडणार असल्याच्या चर्चांणा उधाण आलं आहे. यावर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर लग्न समारंभ किंवा सार्वजनिक कार्यक्रमांवर काही निर्बंध घालण्यासंदर्भात विचार सुरु असल्याचं मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे. पुणे मुख्य शहर असल्यानं रुग्ण संख्या आटोक्यात आणणं महत्वाचं आहे. पुण्यात पुन्हा कोरोनाचा आलेख वाढताना दिसत आहे. शहराचा पॉझिटिव्हीटी रेट हा आता 10% पर्यंत जाउन पोहोचला असल्याची माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

वाढत्या रुग्णवाढीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी 4 वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. महाराष्ट्रात कोरोना वाढीची सुरवात पुण्यातच झाली होती. लाॅकडाऊनच्या काळात रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली होती. मात्र नियम पुन्हा शिथिल केल्याने पुन्हा रुग्णसंख्या वाढत आहे.

दरम्यान, 11 फेब्रुवारी रोजी दिवसभरात 256 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. 12 फेब्रुवारी रोजी दिवसभरात 258 नवे कोरोना रुग्ण वाढले होते. 13 फेब्रुवारी रोजी कोरोनाचे रुग्ण वाढून दिवसभरात येथे 331 नवे रुग्ण आढळले होते. त्यानंतर येथे एकूण अ‌ॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 1558 वर पोहोचली होती. सध्या पुण्यात 1719 नवे ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण झाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

शिवजयंती निमित्त खासदार अमोल कोल्हेंनी केला नवा संकल्प!

‘तु बोलतो किती, तुझी औकात किती….’; अमोल मिटकरींची पडळकरांवर बोचरी टीका

संजय राठोडांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले….

“आमची सत्ता असताना इंधन दरवाढीवरून टिव टिव करणारे अमिताभ आणि अक्षय गप्प का?”

गृहिणींचं बजेट कोलमडलं… सिलेंडरच्या दरात ‘इतक्या’ रुपयांची वाढ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या