बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सुप्रियाताईंची धडपड केविलवाणी, लोकसभा निवडणुका नसल्याने ताई पुण्यात जास्त नसतात”

पुणे | आंबिल ओढ्यावरून पुण्यातील राजकारण तापताना दिसत आहे.स्थानिकांच्या विरोधानंतर देखील पुण्यातील आंबिल ओढा परिसरात अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका केली आहे. सुप्रिया सुळेंनी केलेल्या टीकेला मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

पुण्याच्या घटनेची चौकशी व्हावी. या घटनेवर पुणे महापौरांनी उत्तर द्यावं. आंबिल ओढ्यावरील कारवाई कुणी केली हे सर्वांना माहिती आहे. पुणे महापालिकेत सत्ता कुणाची आहे तर भाजपची. त्यामुळे महापौरांना जर झेपत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं. यावरून मुरलीधर मोहोळ यांनी टीका केली आहे.

आंबील ओढा अतिक्रमण कारवाईसाठी प्रशासनावर दबाव आणला कोणी? हा मूळ मुद्दा भरकटवण्यासाठी  सुप्रियाताईंची धडपड केविलवाणी आहे. विकासक कोणाच्या जवळचा आहे, हे पुणेकर जाणतात.
हल्ली लोकसभा निवडणुका नसल्याने ताई पुण्यात जास्त नसतात, त्यामुळे त्यांना पुण्यात काय चाललंय याची माहिती नसावी, असं मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, प्रश्न उरला झेपत नसेल तर राजीनामा द्यावा तर सर्व पुणेकरांना माहिती आहे. कोरोनाच्या एवढ्या मोठ्या संकटात आम्ही किती सक्षमपणे लढलो, पुण्याला संकटातून बाहेर काढलं. आमच्या लढ्याचं कौतुक त्यांचेच बंधू असलेले पालकमंत्री अजित पवारांनी केलं आहे. कदाचित अजितदादांच्या मताशी सुप्रियाताई सहमत नसतील, असं म्हणत मुरलीधर मोहोळ यांनी सुप्रिया सुळेंना टोला हाणला आहे.

थोडक्यात बातम्या- 

“कोरोनाची तिसरी लाट आल्यास इतक्या लाख जणांना संसर्ग होण्याची शक्यता”

कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे शहराची आजची आकडेवारी दिलासदायक

कौतुकास्पद! कोरोनामुळे अनाथ झालेल्या दोन चिमुकल्यांची जबाबदारी खासदार सुप्रिया सुळेंनी स्वीकारली

लसीकरणात महाराष्ट्राने मारला टॉप! देशात 3 कोटी लसीकरण करणारं पहिलं राज्य

‘किस करणं मराठी अभिनेत्रींना शोभतं का?’, ट्रोलर्सना तेजस्विनी पंडितचं उत्तर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More