बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यात रंगला मुळशी पॅटर्नचा थरार! भरदिवसा रस्त्यात तरूणावर सपासप वार करत केला खून, पाहा व्हिडीओ

पुणे | पुण्यामध्ये भरदिवसा एका तरूणावर तीन ते चार चणांनी वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना काही रात्री नाही तर भरदिवसा हा खून करण्यात आला आहे. या खूनामागचं कारण काय तर एमआयडीसी चाकण परिसरातील म्हाळुंगे येथे कंपनीत पाणी पुरवठा करण्याच्या वादातून संबंधित तरूणाची हत्या करण्यात आली आहे.

हत्या झालेल्या तरूणाचं नाव अतुल भोसले असं आहे. अतुल भोसले हा एका कंपनीत दोन टँकरने पाणी पुुरवठा पुरवत होता. मात्र त्याला आरोपी अक्षय शिवलेने फोन करून मला त्या कंपनीला पाणी मी पुरवतो असं म्हणाला. यावरून त्यांच्यात बराच वाद झाला, अशी माहिती पोलीस अधिकारी अरविंद पवार यांनी दिली.

म्हाळुंगे येथील ममता स्वीट दुकानासमोर दुपारच्या वेळी अतुल भोसलेला गाठून त्याच्यावर अक्षय शिवले आणि त्याच्या इतर साथीदारांच्या मदतीने कोयत्याने सपासप वार केले. भर रस्त्यात अतुलवर वार होत होते, मात्र आरोपींच्या हातातील शस्त्र पाहुन कोणीही मधे पडलं नाही. वार केल्यावर आरोपी पसार झाले. अतुल भोसले हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला त्यानंतर रूग्णालयात नेण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, या खूनाप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणामध्ये अक्षय शिवले, गणेश ढरमाळे, गोट्या भालेराव आणि इतर तीन साथीदार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

राजीव हे तुझं जाण्याचं वय नव्हतं!; जितेंद्र आव्हाड यांची अत्यंत भावनिक पोस्ट

रस्त्यावर रुग्णवाहिका हलताना दिसली, पोलिसांनी बघितलं तर अत्यंत धक्कादायक प्रकार उघड

राजीव सातव यांच्याबद्दल बोलताना महाराष्ट्रातील ‘हा’ नेता ढसाढसा रडला

फेसबुकवरुन केलं तरुणीला प्रपोज, आई-वडिलांना भेटवण्याचं सांगून 25 मित्रांकडून गँगरेप

“राजीव सातव हे उभरतं नेतृत्व, मी संसदेतील चांगला मित्र गमावला”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More