बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

3 सेकंदात हत्या, 24 तासात गुन्हेगार जेरबंद; थरकाप उडवणारी घटना

औरंगाबाद | औरंगाबादमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली असून शहरात यामुळे दहशतीचं वातावरण तयार झालं आहे. अवघ्या 3 सेकंदात एका तरुणाला जीवे मारण्यात आलं, ही घटना शहरात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी वेगानं तपासाची चक्रं फिरवली आणि 24 तासाच्या आत आरोपीला जेरबंद केलं.

औरंगाबादच्या सिडको भागात एका दारू पिणाऱ्या तरूणावर चाकू हल्ला करण्यात आला, तो दारु घेण्यासाठी गेला असताना ही घटना घडली. हल्लेखोरानं संधी साधत अवघ्या 3 संकंदात या तरूणाचा जीव घेतला. सिद्धार्थ हिवराळे असं मृत तरुणाचं नाव आहे. रविवारी तो सिडकोतील एन-8 भागातील विश्वास वाईन शाॅप दारु घेण्यासाठी गेला होता, त्यावेळी हा धक्कादायक प्रकार घडला.

हल्ला करुन आरोपीनं घटनास्थळावरुन पळ काढला होता, यावेळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सिद्धार्थला जखमी अवस्थेत एमजीएम रूग्णालयात दाखल करण्यात आलं. तेथून त्याला घाटी रूग्णालयात नेलं असता डाॅक्टरांनी त्याला मृत घोषीत केलं.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते, त्यांनी प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत तातडीनं तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर त्यांना आरोपीचा ठावठिकाणी कळाला, यानंतर पोलिसांनी लगेचच कारवाई करत जाधववाडी भागातून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. विशाल राम आगळे असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे. तो कुख्यात गुन्हेगार असल्याची देखील माहिती आहे. आरोपीनं ही हत्या केली यासंदर्भात अद्याप कुठलीही ठोस माहिती समोर आलेली नाही, मात्र पूर्ववैमनस्यातून सिद्धार्थची हत्या करण्यात आल्याचं बोललं जातंय.

थोडक्यात बातम्या 

‘…त्याआधीच अजित पवारांनी आरक्षण रद्द केलं’; गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप

“शिवसेना निवडणुकीसाठी अशा पद्धतीनं पैसा गोळा करते”; मनसेचा खळबळजनक आरोप

देश अंधारात जाण्याची भीती!; राज्य सरकारची मोदींवर जोरदार टीका

सुसाट सुटणार गाड्या… महामार्गावरील ‘हा’ नियम लवकरच बदलणार!

रवी राणांची आमदारकी जाणार?, रवी राणा म्हणतात…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More