लातूरमधील 19 वर्षीय तरूणीच्या हत्येचा अखेर उलगडा, पाहा काय घडलं…

लातूर | लातूरमधील 19 वर्षीय तरूणीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण लागलं आहे. विशाल नगरमध्ये अपूर्वा यादवची घरात घुसून हत्या करण्यात आली होती.

या हत्येप्रकरणी पोलिसांनी अमर शिंदे या तरूणाला ताब्यात घेतलं. त्याने मित्राच्या आत्महत्येचा बदला घेण्यासाठी अपूर्वाची हत्या केल्याची कबुली दिली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र माने यांनी दिली आहे.

अमरचा मित्र सार्थक बाळासाहेब जाधव हा अपूर्वाचा मित्र होता. अपूर्वाच्या प्रेमासाठी सार्थकने आत्महत्या केली होती. याप्रकरणी तिला पोलिसांनी अटकही केली होती, असंही त्यांनी सांगितलं.  

दरम्यान, 16 तारखेला पावणेबाराच्या सुमारास अपुर्वाची राहत्या घरी हत्या करण्यात आली होती. 

महत्त्वाच्या बातम्या-

-#MeToo ची मला आता भिती वाटायला लागली- शिवसेना अामदार

-#MeToo प्रकरणात पोलिसांनी दोन्ही बाजू तपासल्या पाहिजेत- आदित्य ठाकरे

-धीर सोडू नका, पावसानं पाठ फिरवली असली तरी शासन तुमच्या सोबत आहे!

-विदर्भ दौऱ्यासाठी राज ठाकरे अमरावतीत दाखल; रेल्वे स्टेशनवर जंगी स्वागत

-एकनाथ खडसेंना मंत्रिपदाची तहान प्रदेशाध्यक्षपदावर भागवावी लागणार?