बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

22 वर्षीय तरुणीची बर्थडेलाच हत्या, सेक्स करताना…. आरोपीचा धक्कादायक दावा

नवी दिल्ली | ब्रिटीश पर्यटक ग्रेस मिलान या तरूणीची 2 डिसेंबर 2018 रोजी 22 व्या वाढदिवशी न्यूझीलंडमध्ये हत्या झाली होती. त्यावेळी हत्येचा आरोप असणाऱ्या 26 वर्षीय तरुण जेस केम्पसन या तरूणावर ग्रेसच्या हत्येच्या आरोप होता. मात्र आरोपी जेस केम्पसनने ग्रेसचा सेक्स करताना मृत्यु झाल्याचा दावा केला आहे. जेसने सेक्स करत असताना चोंकिंग झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचं कोर्टात सांगितलं, परंतु कोर्टाने त्याचा हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला.

या प्रकरणात न्युझीलंड कोर्टाने जेस केम्पसनला चांगलंच सुनावलं आहे. तसेच त्याच्यावर घरगुती हिंसाचार विधेयकातील कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ग्रेस मिलान ही युनायटेड किंगडमची रहिवासी होती. तसेच ती टूरवर निघाली असताना तिने अमेरिकेत काही आठवडे घालवले आणि दोन आठवड्यांसाठी ती न्यूझीलंडला गेली.

2 डिसेंबरला तिचा वाढदिवस होता आणि त्याच्या एक दिवस आधी रात्री 9 वाजता ती स्कायसिटीच्या सीसीटीव्हीमध्ये दिसली. त्यानंतर,  साधारण 9 वाजून 45 मिनिटांनी एका हॉटेलमध्ये ती जेस केम्पसन सोबत शेवटची दिसली. 2-3 दिवस झाले तरी ती मेसेज आणि फोनला उत्तर देत नसल्याने तिच्यात कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली.

जेसची या मुलीसोबत टिंडरमार्फत ओळख झाली होती. तसेच सेक्स करताना त्याने मॅसोचिस्टिक अँड बाँडेज सेक्स हा प्रकार केला. त्या प्रकारात चोकिंगचा समावेश होतो. तसेच यामुळेच तिचा गळा आवळण्यात आल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं कोर्टात स्पष्ट झालं. तसेच हा अपघात नसून हत्या असल्याचं कोर्टाने नमूद करत जेसला दोषी घोषित केलं.

थोडक्यात बातम्या – 

दिलासादायक! मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत घट; जाणुन घ्या आकडेवारी

पुनावालांना कोण धमक्या देतंय?, आव्हाड म्हणाले, “खरंखोटं देशाला कळायला हवं”

नाद करा पण पोलार्डचा कुठं! अखेरच्या षटकात अशा प्रकारे पोलार्डने साकारला विजय, पाहा व्हिडीओ

वन मॅन आर्मी! एकटा पोलार्ड चेन्नईला पडला भारी, मुंबईचा चेन्नईवर 4 गड्यांनी विजय

‘पैशासाठी आम्ही पगडी घालत नाही’; पंजाबच्या हरप्रीतचा अक्षय कुमारला टोला

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More