बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यातील गरवारे शाळेच्या मैदानावर केला मित्राचा खून अन्….

पुणे | पुण्यात गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना गरवारे शाळेत एका घटनेनं सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. गरवारे शाळेच्या मैदानावर एका तरुणाने त्याच्या मित्राचा खून केला. धक्कादायक बाब म्हणजे हत्येनंतर आरोपीने जे केलं ते ऐकून सर्वच हैराण झालेत. संबंधित आरोपीचं नाव किसन वरपा असं आहे.

मृत झालेल्या तरुणाचं नाव राजन असं आहे. राजन आणि किसन दोघेही रविवारी रात्री दारु पिण्यासाठी कर्वे रोडवरील गरवारे शाळेच्या मैदानावर जाऊन बसले. यावेळी दोघांमध्ये काही कारणावरुन वाद झाला. त्यानंतर रागात किसनने राजनच्या डोक्यात डब्बा घातला. यावेळी राजन गंभीर जखमी झाला असून किसनने राजनला एका वर्गात नेलं आणि त्याच्यावर पुन्हा वारंवार वार करत त्याचा जीव घेतला.

हत्येनंतर किसन तेथून फरार झाला. राजन परत न आल्याने त्याच्या नातेवाईकांनी सर्वत्र शोधाशोध सुरु केली. शेवटी मंंगळवारी दुपारी त्यांनी वारजे पोलिसांकडे बेपत्ता असल्याची तक्रार दिली. अशातच किसन हा बुधवारी पहाटे पुन्हा गरवारे शाळेत आला. त्यानंतर त्याने राजनची हत्या केलेल्या वर्गात जाऊन पाहिले तेव्हा त्याला राजनचा मृतदेह तेथेच पडलेला दिसून आला.

दरम्यान, मृतदेह पाहताच किसनने थेट पोलीस ठाणे गाठलं. त्याने स्वतः आपला गुन्हा कबुल करुन आपल्याला अटक कररण्याची मागणी केली. पोलिसांनी गरवारे शाळेत जाऊन खात्री केली. तेव्हा तेथे राजन याचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन किसन वरपा याला अटक केली.

थोडक्यात बातम्या-

काय सांगता ! घाटी रूग्णालयात ICU मधील ‘या’ उपकरणाचा कोरोना अहवाल आला पॉझिटिव्ह

“फडणवीसांची वेदना मी समजू शकतो, त्यांना वाटतं माझ्यामुळे त्यांची सत्ता गेली”

भाजपमध्ये गेलेले आमदार स्वगृही जातील या भीतीनं भाजपचा एककलमी कार्यक्रम – नवाब मलिक

लग्नात नवरा पोहोचला दारुच्या नशेत, हार घालताना समोर पत्नी दिसलीच नाही अन्…

साताऱ्यात 8 वर्षीय मुलीला चालत्या ट्रेनमधून दिलं फेकून, कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More