महाराष्ट्र मुंबई

खळबळजनक! मुंबईत थर्टी फर्स्टच्या पार्टीत तरुणीची हत्या; हत्येचं कारण ऐकून सुन्न व्हाल

मुंबई |मुंबईत एक खळबळजनक घटना घडली आहे. मुंबईतील खार परिसरात हायप्रोफाईल सोसायटीत एका मुलीची हत्या करण्यात आली आहे.

खार परिसरात भगवती हाईट्स नावाची इमारत आहे. या इमारतीच्या गच्चीवर काल नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत इमारतीतील काही रहिवाशी, तसेच त्यांचे जवळचे मित्र, नातेवाईक सहभागी झाले होते. या पार्टीत अनेकांनी दारु प्यायली होती.

पार्टी सुरु झाल्यानंतर ती मृत मुलगी गच्चीवर पोहोचली. त्यावेळी त्या ठिकाणी एक जोडपे आक्षेपार्ह स्थितीत तिथे बसले होते. त्या मृत मुलीने त्या जोडप्याला हटकत त्यांच्यावर आक्षेप घेतला. यावरुन या जोडप्याचा आणि त्या मुलीचा वाद सुरु झाला. वाद अगदी विकोपाला पोहोचला. त्या जोडप्याने त्या मुलीला जबर मारहाण केली. या मारहाणीदरम्यान तिला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पोलिसांनी या प्रकरणी मृत मुलीला मारहाण करणाऱ्या त्या जोडप्याला अटक केली आहे.

थोडक्यात बातम्या-

‘4 जानेवारीला ठोस निर्णय घ्या, अन्यथा…’; शेतकऱ्यांचा केंद्राला इशारा

“भाजपवाल्यांनी चिंतातुर जंतूप्रमाणे उगाच वळवळ करू नये”

“बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचं नामांतर तीस वर्षांपूर्वीच केलं”

कंगणा राणावतच्या अडचणीत वाढ; कंगणाची ‘ती’ याचिका न्यायालयाने फेटाळली

संजय राऊत यांचे निकटवर्तीय असणाऱ्या प्रवीण राऊतांची इतक्या कोटींची संपत्ती जप्त!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या