बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तीन महिन्यांपूर्वी लव्ह मॅरेज, पत्नीने शिवी दिल्याचा राग आला अन् त्याने उचललं टोकाचं पाऊल

पुणे | पुण्यातील देहू येथे सर्वांना हादरवून सोडणारी घटना घडली आहे. एका तरुणाने तीन महिन्यांपूर्वी एका तरुणीशी प्रेमविवाह केला होता. मात्र गोडीगुलाबात सुरु असणाऱ्या संसारात अडचणी येऊ लागल्या. अशातच एका क्षुल्लक कारणावरुन तरुणाने आपल्या पत्नीची हत्या केली.

आरोपी पतीचं नाव वैभव असं आहे तर मृत झालेल्या पत्नीचं नाव पूजा असं आहे. पूजा आणि वैभवचा तीन महिन्यांपुर्वी प्रेमविवाह पार पडला होता. मात्र सुखात चाललेल्या प्रेमाच्या संसारात काही दिवसांनी खटके उडू लागले. अशातच गुरुवारी सायंकाळी पूजा आणि वैभवमध्ये जोरदार भांडणं झाली. यादरम्यान पूजाने वैभवला आईवरुन शिवी दिली.

पत्नीने शिवी दिल्याचा वैभवला प्रचंड राग आला. याच रागातून पूजा झोपली असाताना आरोपी पतीने  मध्यरात्री पूजाचा गळा दाबून धरला. पूजाने आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र वैभवने अखेर तिचा जीव गेल्यावरच गळा सोडला. यातच पूजाचा मृत्यू झाला.

दरम्यान, रात्रभर वैभव पूजाच्या मृतदेहाजवळ बसून होता. पहाट होताच वैभवने पूजाच्या नातेवाईकांना रात्री पूजाच्या छातीत प्रचंड कळा येऊ लागल्यानंतर ह्रदयविकाराचा झटका येऊन पूजाचा मृत्यू झाला, असं सांगितलं. नातेवाईकांनी सर्व प्रकार पोलिसांना सांगताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी काही संशय आला असता वैभवची कसून चौकशी करण्यात आली. तसेच वैभवने गुन्हा कबुल करताच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.

थोडक्यात बातम्या-

दुचाकीस्वाराने पोलिसाला फरफटत नेलं; सीसीटीव्ही फुटेज समोर, पाहा व्हिडीओ

‘माझ्यासोबत झोप मी तुला काम देतो’; ‘या’ अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव

ट्रकचा ब्रेक फेल झाला म्हणून चालकाने केलं रिव्हर्स ड्रायव्हिंग, पाहा व्हिडीओ

कोरोनामुळे मराठी गझलकाराला 90 वर्षांच्या आईसोबत रस्त्यावर राहण्याची वेळ!

हृदयद्रावक! 10 वर्षांनी पहिलं मूल झालं, 6 महिन्यांतच चिमुकलीला कोरोनानं गाठलं अन्…

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More