पुणे | लाॅकडाऊन असून देखील पुण्यात हत्येच्या घटना समोर येत आहेत. पुण्यातील धनकवडी परिसरातील एका इमारतीत एका महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळल्यानेे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित मृत झालेल्या महिलेचं नाव कल्पना घोष असं असून त्या 32 वर्षांच्या आहेत.
कल्पना यांनी त्यांच्या शेजारच्या खोलीत राहणाऱ्या एका महिलेकडून फोनचा चार्जर आणला होता. संबंधित शेजारील महिला तिच्या दोन मुलींसोबत राहते. सोमवारी सकाळी शेजारील महिलेला कामावर जायचं असल्याने कल्पना यांना चार्जरसाठी फोन केला. मात्र कल्पना यांनी फोन उचलला नाही.
कामाला जाण्याच्या गडबीत शेजारील महिला थेट कल्पना यांच्या घरी गेल्या. कल्पना यांच्या घराचा दरवाजा उघडाच असल्याचं पाहून शेजारील महिला घरात गेली. यादरम्यान कल्पना रक्ताच्या थारोळ्यात मृत अढळून आल्या. ही घटना उघडकीस येताच शेजारील महिलेने सहकारनगर पोलिसांना याबाबतची माहिती दिली.
दरम्यान, माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास चालू केला. यावेळी संशायस्पद हलचाली करणाऱ्या एका अनोळखी व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं आहे. तसेच कल्पना यांच्या हत्येमागील कारण अद्याप समोर आलेलं नसून पोलीस आरोपीचा अधिक तपास करत आहेत. एवढच नाही तर इमारतीमधील सीसिटिव्ही फुटेज देखील तपासण्यात येत आहेत.
थोडक्यात बातम्या-
‘द बेस्ट ऑस्कर एव्हर’ म्हणत राम गोपाल वर्मांनी उडवली नरेंद्र मोदींची खिल्ली
सोनूने कहर केला, 13 मुलांना नादी लावून लग्न केलं अन्…
पिंपरीतील कुटुंबावर दुःखाचा डोंगर; दोन दिवसात दोन सख्ख्या भावांचा कोरोनानं मृत्यू
‘माझी आईच जेवण बनवते पण 2 दिवस झाले ती झोपलीये,…’; आईच्या मृतदेहाजवळ बसून राहिली मुलगी
सावध व्हा, या शहरात 341 चिमुरड्यांना कोरोनाची बाधा, काळजी घ्याच…!
Comments are closed.