बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शीर धडावर हवंय ना?, अयोध्येतील साधूची लीना मणीमेकलाईना धमकी

नवी दिल्ली | काली या लीना मणीमेकलाई यांच्या डॉक्युमेंट्री चित्रपटाच्या पोस्टर आणि काही दृश्यांवरुन आता कॅनडासह भारतात वाद पेटला आहे. भारतीय चित्रपट निर्मात्या लीना मणीमेकलाई यांच्या अटकेची मागणी होते आहे. लीना यांनी सोशल मिडीयावर नुकत्याच काली या त्यांच्या डॉक्युमेंट्री चित्रपटाचं पोस्टर टाकलं आहे. त्यानंतर हा वाद सुरु झाला.

अयोध्येतील एका साधूंनी याप्रकरणी आता लीना मणीमेकलाई यांना धमकी दिली आहे. अयोध्येतील हनुमान गढी मंदिरातील महंत राजू दास यांनी लीना मणीमेकलाई यांचे शीर धडापासून वेगळे करण्याची त्यांनी धमकी दिली आहे. जेव्हा नुपूर शर्माने योग्य गोष्ट सांगितली तेव्हा जरभर आग लागली, भारताल आग पेटली. तुम्हाला सनातन धर्माचा अपमान करायचा आहे का? तुम्हाला तुमचे शीर तुमच्या शरीरापासून वेगळं करायचं आहे का? असे प्रश्न दास यांनी विचारले.

महंत राजू दास यांनी या चित्रपटाच्या पोस्टरचा निषेध करत लीना मणीमेकलाई या सनातम हिंदु धर्माचा अपमान करत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी गृहमंत्रालयाला केली. या चित्रपटात कालीमाता या हिंदु देवतेच्या अवतारात (पोशाख) एक अभिनेत्री सिगारेट ओढताना दिसते आहे. तसेच तिच्या एका हातात समलैंगिकांचा (LBGTQ) ध्वज देखील दिसत आहे.

दरम्यान, लीना मनीमेकलाई यांच्या मते सदर चित्रपट हा ऱ्हिदम्स ऑफ कॅनडा फेस्टीवल, आगा खान संग्रहालय, टोरंटो साठीचा एक भाग असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी अशा प्रकारची माहिती देणारी पोस्ट 2 जुलै रोजी ट्विटरवर टाकली होती.

थोडक्यात बातम्या – 

सिंलेडरचे दर नाॅट ओके… सिलेंडर पुन्हा 50 रुपयांनी महागले

‘मंत्रीपदाची संधी मिळाली तर…’; विजय शिवतारेंचं मोठं वक्तव्य

पुढचे 5 दिवस महत्त्वाचे; ‘या’ भागांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली शरद पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

शिवसेना आक्रमक; आणखी एका नेत्याची पक्षातून केली हकालपट्टी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More