बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुरलीधर मोहोळ यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

पुणे | स्पर्धा परीक्षांसाठी कोचिंग क्लासेसला परवानगी देण्यात येत असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा पुण्याचे महापौर  मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे. त्यांनी संदर्भात एक ट्विट केलं आहे. नियम पाळून 50 टक्के आसन क्षमतेत परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

कोरोनाचाच सुरु असलेला प्रकोप पाहता उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज पुण्यात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मोहोळ यांनी दिली.

स्पर्धा परीक्षेच्या पार्श्वभूमीवर कोचिंग क्लासेसला परवानगी द्यावी, अशी सूचना आपण आजच्या पालकमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत केली असता, ती सूचना मान्य करण्यात आल्याचं मोहोळ यांनी सांगितलं आहे.  येत्या 21 तारखेला पूर्व परीक्षा देखील होणार असल्याची घोषण आयोगाने केली आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातल्या कोचिंग क्लासेसला परवानगी देण्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गुरुवारी 14 मार्च रोजी होणारी परीक्षा रद्द करण्यात आल्याची घोषणा केली होती. MPSC ची परीक्षा पाचव्यांदा पुढे ढकलण्यात आल्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले होते.

 

 

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! सचिन वाझेंची ‘या’ विभागात करण्यात आली बदली

पुण्यातील लॉकडाऊनबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य म्हणाले…

अॅमेझाॅन आणि फ्लिपकार्टला टक्कर देणार भारताचा ‘अलिबाबा’; जाणून घ्या अधिक माहिती…

“नरेंद्र मोदींनाही अधूनमधून हुंदके फुटतात, अश्रूंचा बांध फुटतो, ते बरं चालतं”

मोठी बातमी! ‘या’ तारखेला होणार MPSC ची परिक्षा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More