मोठी बातमी! मुरलीधर मोहोळांना मिळालं ‘हे’ महत्त्वाचं खातं

Murlidhar Mohol | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मोदी यांच्यासह एनडीएच्या 72 खासदारांनी मंत्रिपदाची आणि राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मोदी यांच्या शपथविधीनंतर खातेवाटप झालं आहे. पुण्याचे खासदार मुलरीधर मोहोळ यांनी नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्ये केंद्रीय राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आता मोहोळ यांना सहकार आणि नागरी उड्डाण राज्यमंत्री पदाचा कारभार सोपवण्यात आला आहे.

Murlidhar Mohol |मोहोळांना मिळालं ‘हे’ महत्त्वाचं खातं

मुरलीधर मोहोळ हे वयाच्या बाराव्या वर्षापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून कार्यरत आहेत. 1996 मध्ये त्यांनी भाजपच्या कामाला सुरुवात केली. भारतीय जनता युवा मोर्चाची जबाबदारी त्यांनी सांभाळली.

स्थायी समिती अध्यक्ष आणि नंतर महापौर म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. 2024 लोकसभा निवडणुकीत, देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नेतृत्वाची मर्जी संपादन करण्यात यश. पुण्यातून लोकसभेची उमेदवारी आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा पराभव करत खासदार म्हणून दिल्लीत पोहोचलेत.

मुरलीधर मोहोळांनी कोरोना काळात मोठी कामगिरी बजावली. पुण्यात कोरोनाची महामारी असताना ते जनतेत उतरले आणि पुण्यातील कोरोना परिस्थिती उत्तम हाताळली. त्यावेळी ते महापालिकेचे महापौर होते. सोबतच भाजपच्या पक्षश्रेष्ठीसोबत दांडगा आहे.

पक्ष संघटनेत वॉर्ड सरचिटणीस, वॉर्ड अध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चाच्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष, शहर युवा मोर्चाचे अध्यक्ष, युवा मोर्चाचे महाराष्ट्र सचिव, उपाध्यक्ष, शहर भाजपचे सरचिटणीस, शिक्षण मंडळाचे सदस्य, प्रदेश सरचिटणीस अशा विविध भूमिका आणि जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या.

महाराष्टातील मंत्र्यांना कोणती खाती?

नितीन गडकरी – रस्ते आणि परिवहन वाहतूक मंत्रालय
पियुष गोयल – वाणिज्य मंत्रालय
रक्षा खडसे – क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री
मुरलीधर मोहोळ – सहकार आणि नागरी उड्डाण राज्यमंत्री
रामदास आठवले – सामाजिक न्याय राज्यमंत्री
प्रतापराव जाधव – आयुष आणि आरोग्य राज्यमंत्री

महत्त्वाच्या बातम्या- 

नरेंद्र मोदींचं मंत्रिमंडळ जाहीर, कुणाला कुठलं खातं?, वाचा एका क्लिकवर

“मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही”, मुरलीधर मोहोळांचा सुप्रिया सुळेंवर पलटवार

“…तर शिवसेना एकत्र येईल”, शिंदे गटातील नेत्याचं मोठं वक्तव्य

मोठी बातमी! मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचं न्यूयॉर्कमध्ये निधन!

दोन जिवलग मित्रांनी एकत्र संपवलं जीवन, थरकाप उडवणारी घटना आली समोर