Murlidhar Mohol | लोकसभा निकालानंतर नवी दिल्ली येथे नवनिर्वाचित खासदारांची बैठक झाली. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. 09 जून रोजी सायंकाळी 06 वाजता पंतप्रधानपदाचा सोहळा पार पडणार आहे. तर दुसरीकडे मंत्रीपदाच्या शपथविधीचा सोहळा देखील पार पडणार आहे. यावेळी पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ हे मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान याबाबत मुरलीधर मोहोळ यांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली.
मोहोळांना मिळणार मंत्रीपद?
नवी दिल्ली येथे आज नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेत आहेत. तर आज मंत्रीपदाचा शपथविधी सोहळा देखील पार पडणार आहे. यावेळी पुणे लोकसभेचे खासदार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांची मंत्रीपदासाठी लाॅटरी लागली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातून आतापर्यंत नितीन गडकरी. पीयूष गोयल, रक्षा खडसे, प्रतापराव जाधव. रामदास आठवले, मुरलीधर मोहोळ यांना मंत्रीपदासाठी फोन आले आहेत.
मोहोळ भावूक-
माध्यमांना प्रतिक्रिया देत असताना मोहोळ म्हणाले (Murlidhar Mohol) की, एका साध्या बूथवरचा कार्यकर्ता आणि आता देशाच्या सरकारचं काम करणार त्यासाठी मी खूप आनंदी आहे. माेदींंशी बोलत असताना त्यांनी माझ्या पाठीवर थाप मारली शिवाय कैसे हो पुणेकर, असं देखील मोदी म्हणाले. त्यामुळे येत्या काही काळात आता मनापासून काम करायचं आहे.
पुढे मोहोळ भावूक होऊन म्हणाले की, कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही तो आता देशाचं काम करणार. माझा पक्ष, पक्षनेतृत्व, कार्यकर्ते आणि पुणेकर या सगळ्यांना याचं श्रेय जातं. त्यांचा केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश होणार आहे. मुरलीधर मोहोळ प्रथमच पुण्यातून खासदार झाले. त्यानंतर त्यांना सरळ मंत्रीपद मिळत आहे.
News Title : murlidhar mohol to take oath of minister
महत्त्वाच्या बातम्या –
सुनेला केंद्रीय मंत्रिपदासाठी फोन, एकनाथ खडसे झाले भावूक, म्हणाले…
मोदी मंत्रिमंडळात कोण कोण?; फायनल यादी आली समोर
मोठी बातमी! राज्यात पुढील 48 तास अतिवृष्टीचा इशारा; हायअलर्ट जारी
“वादा तोच दादा नवा”; बारामतीत झळकले अजित पवारांना डिवचणारे बॅनर्स
“जो मराठा समाजाला त्रास देणार त्याला विधानसभेत…”, मनोज जरांगेंची तोफ कडाडली