पुणे विमानतळावरुन निघाली मुरलीधर मोहोळांची रॅली, ट्रॅफिक जाममुळे पुणेकर हैराण

Murlidhar Mohol | पुणे लोकसभेचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ शपथविधी झाल्यानंतर पहिल्यांदाच पुण्यात परतलेत. नवनिर्वाचित खासदार म्हणून नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी गेले आणि स्वतः मंत्रीपदाची शपथ घेऊन मोहोळ आले. मोहोळांसह सर्वांसाठी हा सुखद धक्का होता. शपथविधीनंतर आज मोहोळ पहिल्यांदाच दिल्लीहून परतलेत.

मुरलीधर मोहोळ मंत्रीपदाची शपथ घेऊन पुण्यात परतल्यानंतर लोहगाव विमानतळावर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. मात्र, यावेळी कार्यकर्त्यांचा उत्साह आणि एकीकडे ट्राॅफिक जाममुळे पुणेकरांना नाहक त्रास सहन करावा लागल्याचं पाहायला मिळालं.

नेमकं काय घडलं?

केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई उड्डान मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर खासदार मुरलीधर मोहोळ पुण्यात (Murlidhar Mohol) परतले. यावेळी पुणे लोहगाव विमानतळावर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पहायला मिळाली. मात्र दुसरीकडे मोहोळांच्या स्वागतासाठी झालेल्या गर्दीमुळे ट्राॅफिक जाम झाल्याचं चित्र पहायला मिळालं. ट्राॅफिकमुळे पुणेकर हैराण झाले. दरम्यान, आज (15 जून) मोहोळ यांच्या स्वागतासाठी जमा झालेल्या गर्दीमुळे लोहगाव ते टिंगरे नगरपर्यंत पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली.

मोहोळांमुळे ट्रॅफिक?

मुलरीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांचं स्वागत ढोल ताशा, हलगी या वाद्यांनी करण्यात आलं. त्यामुळे लोहगाव ते टिंगरे नगरपर्यंत गर्दी पहायला मिळाली.

‘म्हणजे हा माणूस जेव्हा जेव्हा येणार जाणार पुण्यात तेव्हा जनतेला ट्रॅफिक जॅम सहन करावा लागणार कारण ह्याचे गुंड लोक रस्ते आणि रहदारी थांबवून ठेवतात’, अशा प्रकारे मोहोळांच्या स्वागतानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी त्यांनी ट्रोल केलंय.

News Title : Murlidhar Mohol welcomed at pune airport

महत्त्वाच्या बातम्या-

शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी अण्णा हजारेंचा मोठा गौप्यस्फोट!

हवामान विभागाचा ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा; येणारे दोन दिवस..

मोठी बातमी! नितीश कुमारांची प्रकृती बिघडली, रूग्णालयात केलं दाखल

“अयोध्यावासियांनी भाजपमुक्त राम करुन दाखवला”; उद्धव ठाकरेंनी डिवचलं

SBI ग्राहकांना सर्वात मोठा झटका; बँकेने घेतला मोठा निर्णय