बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मुश्रीफांना तुरूंगात धाडणार, आजपासून ठाकरे सरकारच्या अंताला सुरूवात”

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारला चांगलच घेरलं आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यात आणि किरीट सोमय्या यांच्यामध्ये झालेला वाद सर्वांनाच पाहायला मिळाला. त्यानंतर आता किरीट सोमय्या यांनी कोल्हापूरात जाऊन थेट ठाकरे सरकारविरूद्ध दंड थोपटले आहेत.

किरीट सोमय्या आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. काही दिवसांपूर्वी कोल्हापूरात येणार होते. मात्र, कोल्हापूर पोलिसांनी त्यांना येण्यास मनाई केली होती. त्यानंतर आता किरीट सोमय्या यांना कोल्हापुरात येण्यास परवानगी देण्यास आली आहे. त्यामुळे कोल्हापूरात येताच सोमय्या पुन्हा आक्रमक झाल्याचं पहायला मिळतंय.

कोल्हापूरात पोहचताच सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर हल्लाबोल केला आहे. घोटाळेबाज मंत्री हसन मुश्रीफ यांना तुरूंगात धाडणार असं सोमय्या म्हणाले आहेत. आजपासून ठाकरे सरकारच्या  अंताची सुरूवात झालीय, असंही सोमय्या म्हणाले.

दरम्यान, महालक्ष्मीच्या मंदिरात दर्शन घेऊन आल्यानंतर त्यांनी ठाकरे सरकार आणि मंत्र्यावर आरोप केले आहेत. तर त्यानंतर आज 4 वाजता सोमय्या माध्यांमाशी संवाद देखील साधणार आहेत.

थोडक्यात बातम्या-

धक्कादायक! 2021च्या सुरुवातीला लस घेतली त्यांना कोरोनाचा धोका अधिक

युती नाही पण समझोता! आगामी निवडणुकांसाठी भाजप-मनसेचं गणित ठरलं

‘माझ्या लग्नाची वरात एवढी मोठी काढली नाही’; जयंत पाटील भावूक

43 वर्षापूर्वीची गोष्ट आठवली अन् पठ्ठ्याला लागली 1448 कोटींची लाॅटरी

“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेऊन सांगतो की…”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More