बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना रुग्णांवर ‘म्युझिक थेरपी’, झिंगाट गाण्यावर कोरोना रूग्ण थिरकले ; पाहा व्हिडीओ

अहमदनगर | कोरोना रूग्णसंख्या मागील काही काळात भरपूर वाढली होती. आता परिस्थिती सुधारत असल्यानं आरोग्य कर्मचाऱ्यांना कामातून थोडा आराम मिळताना दिसत आहे. डाॅक्टर आणि परिचारिका यांचा कोरोना स्थिती सुधारण्यात मोठा वाटा आहे. या कोरोनाकाळात शारिरीक स्थिती बरोबरच रूग्णांची आणि काम करणाऱ्या डाॅक्टर आणि कर्मचाऱ्यांची मानसिक स्थिती खालावल्याचं जाणवत आहे. त्यातच रुग्णांची मानसिक स्थिती सुधारण्यासाठी एका कोविड सेंटरमध्ये म्युझिक थेरपीचा वापर करण्यात आला आहे.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघामधील गायकरवाडी येथील आरोळे हॉस्पिटलमध्ये कोविड सेंटर उभारण्यात आलं आहे. त्या कोविड सेंटरमध्ये आज शेकडो रूग्णांवर उपचार केले जात आहे. त्या रूग्णालयात कोरोना रुग्णांसाठी म्युझिक थेरपीचा यशस्वी वापर केला. रूग्णांना मानसिक आधार मिळावा यासाठी ही पद्धत वापरण्यात आली आहे. याचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. सैराट चित्रपटातील झिंगाट गाण्यावर रूग्णांसोबत डाॅक्टरदेखील थिरकताना दिसत आहेत.

‘मन करा रे, प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण…’, अशी काव्यपगंती वापरत रोहित पवार यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे. ‘या उक्तीनुसार आरोळे हॉस्पिटलच्या समन्वयक सुलताना शेख यांनी कोविड सेंटरमध्ये रुग्णांसाठी म्युझिक थेरपीचा यशस्वी वापर केला आणि काही क्षण आजारपण विसरून अनेक रुग्णांची पावलंही झिंगाट गाण्यावर अशी थिरकली!’, असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे.

दरम्यान, मतदारसंघात जामखेडमधील आरोळे हॉस्पिटल येथील कोविड सेंटरला भेट देऊन रोहित पवार यांनी रुग्णांची विचारपूस केली होती. यावेळी डॉ. आरोळे आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांसोबत बैठक घेऊन रोहित पवार यांनी चर्चा केली होती. तसंच कोविडची परिस्थिती, औषधं, लसीची उपलब्धता याबाबतचा आढावा घेतला होता.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

चक्रीवादळ टळलं तरी मुंबईसह उपनगरात ‘हे’ तास धोक्याचे 

पुणे हादरलं! एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी तीन जणांची आत्महत्या

6 दिवसात कोरोना रुग्णाचं बिल 1.83 लाख, 1.18 लाख भरुनही स्कूटी केली जप्त

अखेर तौक्ते चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्यावर धडकलं; मुंबईत 24 तासात अतिवृष्टीचा इशारा

कोरोना पॅाझिटिव्ह आल्यानंतर किंवा बरं झाल्यानंतर लगेच लस का घेत नाहीत?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More