बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मराठमोळी संगीतकार जोडी अडचणीत, ‘या’ कारणामुळे पोलिसात तक्रार दाखल

परभणी | महाराष्ट्रातील प्रसिद्ध संगीतकार जोडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजय-अतुल या जोडीसमोर अडचणी निर्माण झाल्याचं समोर आलं आहे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या मूळ गीताच्या रचनेत बदल करून चुकीच्या अर्थाने सादर केल्याप्रकरणी परभणीच्या नवा मोंढा पोलिस ठाण्यात अजय गोगावले आणि अतुल गोगावले यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

परभणीतील लालसेनेचे प्रमुख गणपत भिसे यांनी अजय-अतुल यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून, अजय-अतुल यांनी ‘माझी मैना गावाकडं राहिली माझ्या जीवाची होतीया काहिली’ या छक्कड प्रकारात येणाऱ्या गीताचं मूळ स्वरूप बदलून ‘वेणी माळायची अजून राहिली, माझ्या जिवाची होतीया काहिली’ असं गाऊन या गीताचा संपूर्ण अर्थ बदलून टाकला असल्याचं त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

मूळ गीत हे ‘बिनी मारायची अजून राहिली…’, म्हणजे घाव घालायचा अजून बाकी आहे, अशा वाक्यरचनेला ‘वेणी माळायची अजून राहिली…’, म्हणजे शारीरिक संबंध ह्या अर्थाने उल्लेख केल्याने या गीताचा संपूर्ण अर्थ बदलला असून अण्णाभाऊ साठे यांनी महाराष्ट्राच्या बलिदानासाठी लढणाऱ्या हुतात्म्यांसाठी लिहिलेल्या या गीताचा आणि अण्णाभाऊ साठे यांचा अपमान झाला असल्याने संदीप लिरिक्स वर्ल्ड या यूट्यूब चॅनलसह संगीतकार आणि गायक अजय गोगावले आणि अतुल गोगावले यांच्याविरोधात परभणीत गुन्हा दाखल करावा अशी मागणी भिसे यांनी आपल्या तक्रारीत केली आहे.

या प्रकरणात परभणीतील नवा मोंढा पोलिस ठाण्यात पोलीस निरीक्षक रामेश्वर टाक यांनी या तक्रारीची चौकशी करण्यासाठी फौजदार गायकवाड यांच्याकडे दिली असल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. या तक्रारीमुळे संगीतकार अजय-अतुल यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांवर जोरदार पावसाचं सावट, हवामान खात्याचा इशारा

रुग्णसंख्या हजारात पण शिल्लक बेड बोटावर मोजण्याएवढेच; ‘या’ शहरातील विदारक परिस्थिती

गुढीपाडव्याच्या निमित्तानं राज्य सरकारने जाहीर केली नवी नियमावली, वाचा सविस्तर

परीक्षा आताच घ्या अन्यथा… ; दहावी-बारावीचे विद्यार्थी आक्रमक

दगा देणाऱ्या पतीला खासगी गुप्तहेराद्वारे तिनं रंगेहाथ पकडलं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More