लखनऊ | देशात मुस्लीम समाज सुरक्षित नाही. धार्मिक दंगली घडवून जमाव हत्येच्या नावाने मुस्लीमांच्या हत्या होतात, असं वक्तव्य समाजवादी पक्षाचे खासदार डाॅ. शफीकूर रेहमान बर्क यांनी केलं आहे.
चंदौसी येथे एक रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
मुस्लिम समाजाला शांतता हवी आहे, हिंसा नको. तरी देखील आम्हाला वेळोवेळी पाकिस्तानला जाण्याचे सांगितले जाते, असंही ते म्हणाले आहेत.
आमचा जन्म याच देशाच्या मातीत झाला आहे. आमचं देशावर प्रेम आहे. याच देशात राहून आम्ही राजकारण करु, असंही ते म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
-नितीश कुमार यांचं मोदी आणि भाजपला जशास तसं प्रत्युत्तर!
-मोदी-राहुल गांधींच्या नावानं विनोद करणं पडलं महागात; खेळणी विक्रेत्याला अटक
-‘या’ अभिनेत्रीला मोदींसोबत डिनर करायचं आहे…!
-सलमान म्हणतो, ‘हा अभिनेता पुढील काळात सर्वात मोठा सुपरस्टार असेल’
-भारताचा कर्णधार जखमी; भारतीय संघाला मोठा धक्का
Comments are closed.