बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुस्लीम तरुणाला ‘जय श्री रामा’च्या घोषणा देण्याची जबरदस्ती

चंदीगड | एका 25 वर्षीय मुस्लीम युवकावर हल्ला करुन त्याला डोक्यावरील टोपी उतरवत ‘जय श्री राम’ अशा घोषणा देण्याची जबरदस्ती केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना गुरुग्राम येथील जेकबपुरा येथे शनिवारी घडली.

जामा मश्जिदातून नमाज पठण केल्यानंतर मोहम्मद बरकत नावाच्या व्यक्तीवर 5-6 लोकांनी हल्ला केला. त्याला त्याच्या डोक्यावरील टोपी उतरवायला लावली. त्यानंतर त्याला ‘जय श्री रामा’च्या घोषणाही देण्यास सांगितलं.

‘भारत माता की जय’ आणि ‘जय श्री राम’ या घोषणा द्यायला सांगितलं. घोषणा देण्यास नकार दिला तेव्हा डुकाचे मांस खायला घालू. अशी धमकीही दिल्याचं मोहम्मदने सांगितलं.

दरम्यान, या घटनेमागे जातीयवाद किंवा धार्मिक ताकदींचा हात नाही. समूहाने नाही तर फक्त दोन व्यक्तींमध्ये हाणामारी झाल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं.

महत्वाच्या बातम्या

-लाच घेणााऱ्या पोलिसांना आता दाखवला जाणार कायमचा घरचा रस्ता

-‘काँग्रेसला आधार’ देण्याचा आम्ही इजारा उचललेला नाही- प्रकाश आंबेडकर

-काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिला राजीनामा

-पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केला नरेंद्र मोदींना फोन!

-तारीख ठरली!!! मैं नरेंद्र दामोदरदास मोदी शपथ लेता हूँ…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More